२८० वर्षांची परंपरा असणारी जगन्नाथ यात्रा यंदा कशी होणार साजरी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |

Jagnanath yatra_1 &n
 
 
 
भोपाळ : सुमारे २८० वर्षे परंपरा असलेल्या जगन्नाथ यात्रेत यंदा खंड पडतो कि काय, असा प्रश्न सध्या भाविकांना पडला आहे. यंदा यात्रा भाविकांविनाच निघेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबद्दल अंतिम निर्मण लॉकडाऊन ३ मे रोजी संपल्यावर पुढील परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. २३ जून रोजी ही यात्रा निघते. २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेनिमित्त या यात्रेची तयारीही सुरू झआली आहे. मंदिरातच अक्षय तृतीया आणि चंदन यात्रेय्या परंपरा जपत रथनिर्माणाची तयारीही सुरू झाली आहे.
 
 
 
 
मंदिर अधिकारी आणि पुरोहितांनी गोवर्धन मठ शंकराचार्य जगतगुरू श्री निश्चलानंद सरस्वती यांच्यासह एक बैठक घेतली परंतू, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. लॉकडाऊनमुळे महिन्याभरापासून मंदिर बंद आहे, पुजाऱ्यांतर्फे नित्यनेमाने पूजापाठ सुरू आहे. गोवर्धन मठ म्हणजे जगन्नाथ पूरी शंकराचार्य जगतगुरु स्वामी निश्चलानंदजी सरस्वती यांनी सर्व पैलूंचा विचार करत निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. मठाचे मत घेतल्यानंतर शंकराचार्य यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. जर लॉकडाऊन वाढवला गेला तर यात्रा रद्द करण्यावरही विचार केला जात आहे. मंदिरातील मुक्त मंडळातील काही सदस्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भाविकांची आणि जनतेची सुरक्षितता हेच प्रमुख ध्येय आता आहे. त्यामुळे यात्रा रद्द करण्यास हरकत नाही.
 


JagnanatJagnanath yatra 1
 
 
 
जर स्थिती नियंत्रणात असेल तर एक पर्याय देण्यात आला आहे. सर्व सीमा सील करून काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा निघेल. तसेच या यात्रेचे थेट प्रक्षेपणही दाखवले जाईल. भाविकांना घरबसल्या यात्रेचा लाभ घेता येईल. या शक्यतेवर सर्वात जास्त विचार करण्यात आला असून हा पर्याय निवडला जाऊ शकतो. याशिवाय आणखी एका पर्यायावर विचार केला जाणार आहे, मंदिरातच संपूर्ण यात्रेच्या परंपरा पूर्ण केल्या जातील. यात मठ आणि मंदिरातील भक्तांनाच सहभाग घेता येईल. यापूर्वी अक्षय तृत्तीया आणि चंदन यात्राही मंदिरातच पार पडली. या निर्णयावर तोडगा निघण्याची शक्यता तूर्त कमी आहे.
 
 
 
 
अडीच हजार वर्षांपूर्वी १४४ वर्षे बंद होती पूजा
 
मंदिरातील नोंदीनुसार २५०४ वर्षांपूर्वी आक्रमण झाल्यानंतर १४४ वर्षे पूजा बंद होती. तसेच विविध परंपराही बंद होत्या. यानंतर आद्य शंकराचार्य यांनी या परंपरा पुन्हा सुरू केल्या. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, १२ व्या शतकापासून आत्तापर्यंत या परंपरा नित्यनेमाने पार पाडल्या जातात.
 
 
 
 
कसे असते यात्रेचे स्वरूप
 
 
भगवान जगन्नाथाची यात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेपासून सुरू होते. मुख्य मंदिरापासून सुरू झाल्यानंतर दोन किमी दूरवर असलेल्या गुंडिचा मंदिरात समाप्त होते. इथेच भगवान जगन्नाथ सात दिवस विश्राम करतात. आषाढ शुक्ल दशमीच्या दिवशी पुन्हा यात्रा मार्गक्रमण करत मुख्य मंदिरात पोहोचते. या यात्रेला बहुडा यात्रा म्हणतात.



@@AUTHORINFO_V1@@