खेळविश्वाला मोठा धक्का ! फुटबॉलपटू चुन्नी गोस्वामी यांची एग्झिट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |
Chunni Goswami _1 &n



कोलकाता : ऋृषि कपूर यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली असतानाच गुरुवारी भारतीय खेळविश्वाला धक्का देणारी दुःखद वार्ता आली आहे. क्रिकेटर आणि महान फुटबॉलपटू चुन्नी गोस्वामी (Chuni Goswami) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोलकाता येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. उपचार सुरू असताना रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि सुदिप्तो असा परिवार आहे.
 
 
 
 
गोस्वामी हे काही मोजक्या खेळाडूंमध्ये गणले जात त्यांनी आपल्या राज्यासाठी क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांमध्ये आपली छाप उमटवली होती. गोस्वामी १९६२ साली आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे ते कर्णधार होते. बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळायचे. दोन्ही खेळांवर त्यांची जबरदस्त पकड होती. हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली आहे.
 
 
 
मधुमेह, प्रोस्ट्रेट आणि हृदयविकाराशी झुंज देत होते. त्यांना रोज इनसुलीन घ्यावे लागत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचा मेडिकल सुपरवाइजर नियमितरित्या पोहोचू शकला नव्हता. त्यांच्या पत्नी त्यांना औषधे देत होत्या. फाळणीपूर्वीचा बंगाल असलेल्या किशोरगंज जिल्ह्यात म्हणजे सध्याचा बांग्लादेशात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव सुबीमल होते. मात्र त्यांच्या टोपण नावाने त्यांना ओळखले जात होते.
 
 
 
रोम ऑलंपिकमध्ये घेतला होता सहभाग
 
त्यांनी भारतासाठी १९५६ ते १९६४ दरम्यान ५० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात रोम ऑलंपिकचाही सामावेश होता. त्यांनी आपल्य आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १३ गोल केले. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून १९६२मध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले. भारताची फुटबॉल स्पर्धेतील ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. बंगालसाठी त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले. १९६२ ते १९७३ दरम्यान त्यांनी ४६ सामन्यात बंगालचे प्रतिनिधीत्व केले होते.
@@AUTHORINFO_V1@@