मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनू नये म्हणून चीन काहीही करू शकतो : डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |
 
donald trump_1  
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे ‘मला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यापासून रोखण्यासाठी चीन काहीही करू शकतो’ असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला आहे की, “चीन त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यापासून रोखत आहे. ते मला थांबवण्यासाठी काहीही करू शकतात. कोरोनाशी सामना करण्याचा चीनचा प्रयत्न, या गोष्टीचा पुरावा आहे.”
 
 
पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीनला वाटत आहे की, डेमोक्रेटिक उमेदवार जो बिडेन राष्ट्राध्यक्ष बनावे. चीनने आधीच या महामारीबद्दल जगाला सांगायला हवे होते. आतापर्यंत या महामारीमुळे अमेरिकेत ६० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे.” ट्रम्प यांना विचारण्यात आले की, “चीनसाठी कर्ज माफी आणि टॅरिफमध्ये दिलेली सुट परत घेम्यावर विचार करत आहात का?” यावर ट्रम्प म्हणाले की, “खूप काही असे आहे, जे मी करू शकतो. चीन स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.”
@@AUTHORINFO_V1@@