कोरोनामुळे थायलंडमधील १ हजार हत्तींवर उपासमारीची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
elephants _1  H
 
 
 

पर्यटन बंदीमुळे माहुतांचा रोजगार ठप्प


 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचा प्रभाव आता प्राण्यांच्या देखभालीवर पडू लागला आहे. थायलंडमध्ये बंदिस्त अधिवासात राहणाऱ्या जवळपास ४ हजार हत्तींसाठी अन्नधान्य मिळविणे माहुतांना मुश्किल झाले आहे. त्यामुळे जवळपास एक हजार हत्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यटन बंदीमुळे माहुतांचा रोजगार ठप्प झाला आहे.
 
 
थायलंडमध्ये पर्यटनासाठी मोठ्या संख्येने हत्तींना पाळण्यात येते. मात्र, कोरोना व्हायरसच्या सावटाखाली या हत्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. थायलंडमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा १,६५१ हून अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यटन बंद आहे. याचा फटका थेट हत्तींच्या देखभालीवर पडला आहे. कारण, थायलंड मधील पर्यटनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हत्ती आहेत. पर्यटनच बंद असल्याने हत्ती पाळण्याऱ्या माहुतांची रोजगार ठप्प झाला आहे. हे हत्ती दररोज २०० किलो अन्न खात असल्याने त्यांच्यासाठी खाणे खरेदी करण्यास माहुत असर्मथ ठरत आहेत.
 
 
'सेव्ह एलिफंट फाऊंडेशन'चे संस्थापक लेक चलर्ट यांनी सांगितले की, या हत्तींच्या देखभालीसाठी सरकारने वेळीच पाऊले उचलली नाहीत, तर गर्भवती असणाऱ्या मादी हत्ती एकतर भुकेने मरतील वा खाणे शोधण्यासाठी त्यांना रस्त्यावर सोडून द्यावे लागेल. हत्तींचा व्यवसायिक कामांसाठी म्हणजे उद्योगधद्यांमध्ये सामानाची ने-आण करण्यावर थायलंडमध्ये १९८९ पासून बंदी आहे. परंतु, आताच्या परिस्थितीनुसार त्यांना या कामासाठी किंवा प्राणिसंग्रहालयांना विकू जाऊ शकते.
उत्तर थायलंडमधील माई चाईम हत्ती अभयारण्यातील केरी मॅकक्रिया यांनी सांगितले की, या अभरण्याच्या आसपासच्या गावातील लोकांना पर्यटनामधून पैसे मिळत नसल्याने त्यांनी जवळपास ७० हत्ती पुन्हा अभयारण्यात आणून सोडले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@