औरंगाबादेत ७ तब्लिगी जमातीचे लोक क्वारंटाइन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |


kalagram _1  H


औरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या तब्लिगी जमातीच्या शहरात आलेल्या सात जणांना महापालिका प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात असून त्यांनाही क्वारंटाइन केले जाणार आहे. दिल्लीच्या मरकज मधून औरंगाबादमध्ये २९ तब्लिगी आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. २९ पैकी १४ जण औरंगाबाद शहरातील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांना शोधून तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.





शोधकार्य केल्यानंतर चौदा नव्हे
, तर सातच जण औरंगाबादेतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना कलाग्राममध्ये तपासणी करत क्वारंटाइन केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना दिली. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असून तशा शासनाच्या सूचना आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. आत्तापर्यंत १४४ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या कलाग्राम येथे २० जाणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@