कोरोनाग्रस्तांसाठी मर्सिडीज बनवणार हॉस्पिटल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
mercedez_1  H x

१५०० बेडची सुविधा असणारे हॉस्पिटल पुण्यात उभे राहणार

पुणे : जगभरात करोना व्हायरसची भीती पसरली आहे. भारतात करोनामुळे मृत्युमुखींची संख्या दुहेरी झाली आहे. करोनावर मात करण्यासाठी भारत सरकारला सर्व स्तरांतून पाठींबा आणि मदत केली जात आहे. जर्मनीची प्रसिद्ध ऑटो कंपनी मर्सिडीज बेंजने पुण्याजवळील चाकण परिसरात १५०० बेडचे हॉस्पिटल बनवणार असल्याची घोषणा केली आहे. चाकण परिसरात ही जागा आहे. परंतु, सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने या ठिकाणचे काम बंद आहे. या जागेचा वापर मर्सिडिज तात्पुरत्या हॉस्पिटलसाठी करणार आहे. या हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये १५०० बेड असणार आहेत.


कंपनीने सांगितले की, ही सुविधा म्हाडाच्या परिसरात असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ३७४ खोल्या आहेत. कंपनीचे सर्व कर्मचारी एक-एक दिवसाचा पगार या मोहीमेसाठी देणार आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली रक्कम कंपनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री निधीत जमा करणार आहे. करोनावर मात केल्यानंतर तसेच देशातील करोना संपुष्टात आल्यानंतर या हॉस्पिटलमधील सर्व उपकरणे खेडच्या रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


करोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वात आधी ऑटोमोबाइल कंपन्या मदतीसाठी पुढे आल्या. मारूती सुझुकी, महिंद्रा कंपनीने व्हेंटिलेटर बनवणे सुरू केले आहे. मारुती सुझुकीने देशात व्हेंटिलेटर बनवण्यासठी एजीव्हीए हेल्थकेअरसोबत मिळून काम करण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनीने खूप कमी किंमतीचे व्हेंटिलेटर प्रोटोटाइप तयार केले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@