क्वारंटाइन तब्लीगींच्या विक्षिप्तपणाचे करायचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
tabligi_1  H x

क्वारंटाइनमधील तब्लीगी जमातच्या रुग्णांचे महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लील कृत्य

गाझियाबाद : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमधून निघालेले तब्लीगी जमातीचे लोक देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचे संक्रमण करण्यासाठी जबाबदार धरले जात आहेत. आता या लोकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. गाझियाबाद येथील एमजीएम रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या जमातीतील १३ रुग्णांनी महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लोक विवस्त्र फिरत आहेत. त्यामुळे महिला नर्स आणि इतर लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोतवाली ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. गाझियाबादचे पोलिस अधिकारी कलानिधी नैथानी यांनी पीडित व्यक्तींचा जबाब नोंदवून घेतल्याचे सांगत याबाबत निष्पक्ष चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले. तर जिल्हाधिकारी अजयशंकर पांडे यांनी कोरोना विषाणूवरील उपचारासाठी झटत असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबरील गैरवर्तणूक सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, इंदूर येथेही वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. तर दिल्ली येथे क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या जमातीतील लोकांना डॉक्टरांवर थुंकल्याचे प्रकरण समोर आले होते. आताचे प्रकरण हे गाझियाबाद येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केलेल्या जमातीतील लोकांचे आहे.


जमातीतील हे लोक वॉर्डमध्ये अश्लील गाणे म्हणत आहेत. विवस्त्र फिरत आहेत. महिला कर्मचाऱ्यांकडे विडी-सिगारेटची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांवर उपचार करता येणे शक्य नसल्याचे या महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या वॉर्डमध्ये एकून ३२ कोरोना विषाणू संशयित रुग्णांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये १३ लोक मरकजमधून आलेले आहेत. त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.



@@AUTHORINFO_V1@@