देशातील ४० प्रख्यात खेळाडूंशी साधला संवाद
प्रतिनिधी (मुंबई) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील प्रख्यात खेळाडूंशी व्हिडीओ काॅन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच लॉकडाऊनच्या वेळी देण्यात आलेल्या सल्ल्यांचे निरंतर पालन करण्यास लोकांना सांगण्याबरोबरच सामाजिक अंतर दूर करण्याचा संदेश जनतेला दिल्याबद्दल खेळाडुंचे कौतुक केले.
देशावर ओढावलेल्या कठीण प्रसंगात नेहमीच खेळाडू देशामागे उभे राहिले आहेत. अशा काही खेळाडूंचे कौतुक करण्याबरोबर कोरोना व्हायरसप्रती जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील ४० नावाजलेल्या खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, महिला हॉकी संघाचा कर्णधार राणी रामपाल, बॅडमिंटनपटू पी. स्पिरिंटर , हिमा दास, पॅरा अॅथलिट हाय जम्पर शरद कुमार, अव्वल टेनिसपटू अंकिता रैना, क्रिकेटपटू युवराज सिंग आणि पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. यावेळी मैदानावर उत्तम कामगिरी करून देशाचा गौरव केल्याबद्दल मोंदीनी खेळाडूंचे कौतुक केले.
सद्या अनेक खेळाडू आपआपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबद्दल लोकांना जनजागृतीपर संदेश देत आहेत. पंतप्रधानांनी खेळाडूंना आपल्या संदेशामध्ये यापुढे पाच मुद्द्यांचा समावेश करण्यास सांगितले. महामारीचा सामना करण्यासाठी 'संकल्प', सामाजिक अंतर पाळण्यासाठी 'संयम', सकारात्मकता निर्माण होण्यासाठी 'सकारात्मकता', या लढाईत अग्रभागी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीसाचा आदर करण्यासाठी 'सन्मान' आणि वैयक्तिक पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान सहाय्यता फंडाच्या योगदानासाठी 'सहयोग' यांचा समावेश आहे.