अवघ्या ‘एवढ्या’ रुपयांसाठी इरफान क्रिकेटपटू होऊ शकला नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |

irrfan khan_1  
मुंबई : दिग्गज अभिनेता म्हणून ज्याने हिंदीसोबतच जगातील चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःच्या कामाने आपले नाव कमवले होते, असा इरफान खानने ५४व्या वर्षी एक्झिट घेतली. त्याच्या अनेक आठवणींनी त्याचे चाहते हळवे झाले आहेत. त्याच्या अकाली जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा फटका बसला आहे. पण अभिनेता होण्यापूर्वी त्याने क्रिकेटमध्येही आपले नशीब आजमावले होते.
 
लहानपणी त्याची क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. राजस्थान येथे जन्मलेल्या इरफानला क्रिकेटची ओढ होती आणि घराशेजारील चौगान स्टेडियमवर जाऊन तो क्रिकेट खेळायचा. त्याला शाळेत जाण्याऐवजी क्रिकेटचा सराव करणे अधिक आवडायचे. त्याच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितल्यानुसार, तो चांगला क्रिकेटपटू होता आणि सी. के. नायुडू चषक स्पर्धेसाठी त्याची निवड निश्चित मानली जात होती. पण, गरीबी आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे इरफानचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
 
एका मुलाखतीमध्ये इरफानने सांगितले होते की,”मला क्रिकेटपटू बनयाचे होते. मी अष्टपैलू खेळाडू होतो आणि माझ्या संघातील सर्वात युवा खेळाडू होते. मला क्रिकेटपटू म्हणूनच कारकीर्द घडवायची होती. सी के नायुडू स्पर्धेसाठी माझी निवड झाली होती आणि तेव्हा मला पैसे हवे होते. त्यासाठी कोणाला विचारावे हे मला तेव्हा कळले नाही. मला ६०० रुपये हवे होते आणि तेही मी मागू शकलो नाही.” यानंतर त्याचे पाय हे अभिनयाकडे वळले आणि एनएसडीमध्ये प्रवेश घेतला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@