मै वही सुनता हूँ जिससे मेरे इरादे मजबूत हो !

    29-Apr-2020
Total Views |
irrfan khan_1  
 
 


वित्तीय कंपन्यांच्या जाहिरातींचा इरफान बनला होता 'ब्रॅण्ड'

 
मुंबई : एक जाहिरातीत फ्रॅक्ट्रीचा मालक इरफान कॅबिनमध्ये बसलेला असतो, तितक्यात एक कर्मचारी त्याला नव्या प्रकल्पाबद्दल सांगण्यासाठी येतो. 'सर ये नया प्रोजेक्ट न थो़डा डिफिकल्ट लग रहा है', इरफान त्याला विचारतो 'क्या ?' 'सर वो नया प्रोजेक्ट' कर्मचारी पुन्हा पुटपूटतो. 'नही वो कौनसा वर्ल्ड डिफ्', इमरान पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहतो. 'सर तुम्ही यापूर्वी कधी डिफिकल्ट (Difficult) शब्द ऐकला नाही का ?' यावर 'ऐकला असता तर इतक्या मोठ्या फ्रॅक्ट्रीचा मालक कधी बनू शकलो नसतो.', असे सांगत इरफान तिथून निघून जातो. जाताना कर्मचाऱ्यालाही कामाची उर्जा देऊन जातो.
 
 
 
 
 
सिनेमा असो किंवा जाहिरात त्याचा पडद्यावरील सहज वावर एकूणच समोरच्या प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याला जोडण्यासाठी प्रवृत्त करायचा. यामुळेच त्याला वित्तीय कंपन्या, बँकींग किंवा अन्य कॉमर्स क्षेत्रातल्या जाहिराती मिळत गेल्या आणि त्यात तो एक विश्वासाचा चेहरा वाटू लागला. मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य व्यक्तीलाही तो आपलासा वाटत होता. अशामुळे इरफान या जाहिरातींचा ब्रॅण्ड बनला होता. सुटाबूटातला सहज वावर त्याच्या पात्राला खरेपणा आणून द्यायचा. बटबटीत किंवा आव आणलेल्या जाहिरातींपेक्षा तो निराळा राहिला. त्याच्या चाहत्यांच्या मते, त्याच्या जाहिरातीतलाही अनुभव पाहण्यासारखा असायचा, अशा या अवलीयाच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीसह जाहिरात विश्वाचेही नुकसान भरून न निघणारे आहे.