कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |

dhule_1  H x W:


७० बससह १४० चालक सज्ज!


धुळे : लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ७० बसेस धुळ्याहून रवाना झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगाराच्या ७० बसेस कोटाकडे रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारशी यासंदर्भात चर्चा केली होती.


धुळे ते कोटा हे ६३० किलोमीटरचे अंतर असल्याने प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चालकांना संरक्षणासाठी परिवहन महामंडळाने मास्क, सॅनिटायझर यासारखे आवश्यक साहित्य दिले आहे. सर्व सत्तर बसेस महामंडळाने सॅनिटाईझ करुन घेतल्या आहेत.





कोटामध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील ६० विद्यार्थी काल दुपारी दोन वाजता शहरात दाखल झाले. एका खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना राजस्थानातून बीड शहरात आणण्यात आले. राज्यातील तब्बल अठराशे विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. लॉकडाऊनमुळे १७८० विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@