पेट्रोल-डिझेलवर कोरोना टॅक्स : पाच रुपयांनी वाढल्या किमती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |
asam oil_1  H x
 
 

 

गुहावटी : कोरोनाशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे, इतर देशांमध्येही असलेल्या लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलांच्या किमतीत घट झाली आहे. दरम्यान, कोरोना महामारीशी (Coronavirus Pandemic) लढण्यासाठी नागालँड सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोविड-19 सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल ६ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ५ रुपये प्रतिलिटरने वाढले आहे.
 
 
 
२८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच हा अधिभार लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. आसाम सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त आयुक्त सेंटियांगर इमचेन यांनी ही माहीती दिली आहे. नागालँड टॅक्सेशन कायदा १९६७ अंतर्गत नियमानुसार राज्यपालांनी हा आदेश जाहीर केला आहे. या व्यतिरीक्त कोरोना अधिभारही लावण्यात आला आहे.
 
 
 
आसाम आणि मेघालयमध्ये वाढल्या इंधनाच्या किंमती
 
 
यापूर्वी आसामने कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इंधनाच्या किमतीत वाढ केली होती.आसाममध्ये पेट्रोलचे दर ७१.६१ रुपयांनी वाढून प्रतिलीटर ७७.४६ रुपये इतके झाले होते. तर डिझेलचे दर ६५.९७ रुपयांनी वाढून ७०.५० रुपयांवर वाढवण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहते. करात वाढ केल्यानंतर इंधनाच्या किमती सहा रुपयांनी वाढल्या आहेत.
 
 
मेघालयमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव ७४.९ रुपये आणि डिझेलचा दर ६७.५ रुपये इतका होता. सरकारी अधिसूचनेनंतर पेट्रोलवर ३१ टक्के म्हणजे १७.६ रुपये प्रतिलीटर तर डिझेलसाठी २२.५ टक्के म्हणजे १२.५ रुपये प्रतिलीटर कर आकारण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेलवर प्रत्येकी दोन टक्के विक्रीकरही लावण्यात येणार आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@