महाराष्ट्राचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |


samarth ramdas_1 &nb



नाशिकमधील तपाचरणाच्या काळात स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे, हिंदवी संस्कृती रक्षणाचे स्वप्न पाहिले होते. पुढे बारा वर्षांनी तीर्थाटनाहून परत महाराष्ट्रभूमीत आल्यावर स्वामींनी धार्मिक पातळीवर समाजसंघटनाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली.



समर्थ रामदासांनी
५९व्या कडव्यात अनुष्टुप छंदात लिहिलेल्या आनंदवनभुवनीया काव्याचा थोडक्यात परिचय मागील दोन लेखांतून आपण करून घेतला. नाशिकच्या टाकळी पंचवटी परिसरात राहून स्वामींनी बारा वर्षे गायत्री पुरश्चरण केले आणि रामनामाचा तेरा कोटी जप पूर्ण केला, असे त्यांचे चरित्रकार सांगतात. जुलमी सुलतानी सत्तेचे चटके ठोसर कुटुंबाने स्वामी लहान असतानाच सोसले होते. त्यामुळे बालवयातच नारायणाच्या मनात मुसलमानी सत्तेविषयी चीड होती. ते स्वाभाविक म्हणावे लागेल. नाशिकमधील तपाचरणाच्या काळात स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे, हिंदवी संस्कृती रक्षणाचे स्वप्न पाहिले होते. पुढे बारा वर्षांनी तीर्थाटनाहून परत महाराष्ट्रभूमीत आल्यावर स्वामींनी धार्मिक पातळीवर समाजसंघटनाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली.

आपली स्वप्ने, ध्येये प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वातावरण निर्माण करायच्या कामाला ते लागले. नाशिक पंचवटीच्या तपोवनात असताना इ.स. १६३0च्या आसपास स्वामींनी हिंदू संस्कृती परकीय आक्रमणापासून मुक्त झाल्याची व हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याची स्वप्ने पाहिली होती. तो काळ हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने अंधःकारमय काळ होता. म्हणून आनंदभुवनीकाव्यात स्वामी, ‘स्वप्नी जे देखिले रात्रीअसे म्हणतात. ही रात्र म्हणजे तो अंधःकाराचा काळ होता. परंतु, त्यानंतर ते ते तैसेचि होतसेअसा स्वप्नपूर्तीचा काळ यायला मध्यंतरीची अनेक वर्षे जावी लागली. त्या मध्यंतरीच्या काळात अनेक अनुकूल घडामोडी घडत गेल्या. पुढे इ. स. १६७४ साली एक आनंदाचा प्रसंग महाराष्ट्राने पाहिला. तो म्हणजे शिवराज्याभिषेकाचा, हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याचा दिवस.



ज्येष्ठ शुद्ध शके
१५९६ म्हणजेच जून, १६७४ रोजी शनिवारी शिवरायांना स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. पारतंत्र्यरूपी रात्रीच्या अंधःकारात स्वामींनी नाशिक पंचवटीत जे स्वप्न पाहिले होते, ते आता प्रत्यक्षात आले, याचा सर्वाधिक आनंद स्वामींना झाला असणार. या संदर्भात श्री. म. माटे लिहितात, “... इतर कोणी संतांनी, तुकारामबुवा तर केव्हाच गेले होते... हा आनंद मानला काय? समर्थांनी खचित मानला. हे त्यांच्या आनंदवनभुवनीकाव्यावरून स्पष्ट दिसून येते.” (रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान). शिवरायांना राज्याभिषेक झाला ते वर्ष आनंदनाम संवत्सरहोते. स्वामींनी आपले स्वप्न, ध्येय या आनंदनाम संवत्सरात प्रत्यक्षात उतरलेले पाहिले. म्हणून ते व्यक्त करणार्‍या काव्यास आनंदवनभुवनीअसे नाव दिले असावे. स्वामींच्या काळी मुसलमानी अंमल सर्वत्र पसरला होता. त्यामुळे गुप्तता पाळण्यासाठी लिखाणात, विशेषतः राजकारणासंबंधी लेखनात गूढार्थाची आवश्यकता होती. स्वामींचे आनंदवनभुवनीहे काव्य शिवराज्याभिषेकानंतर काही काळाने लिहिले असेल, तर त्यातील अर्थ गुप्त ठेवण्याची आवश्यकता नव्हती. असे कोणी म्हणतील, पण स्वामींचे विचार पुढचा विचार करणारे होते. त्यांना हे माहीत होते की, हे काव्य महंतांद्वारा महाराष्ट्राबाहेरही जाणार. तेव्हा काही गुप्त संदेश गूढार्थात मांडणे योग्य होते. त्यातील रहस्ये बाहेर कळू नयेत, याची दक्षता स्वामी घेत असत. या काव्यातील १७वे कडवे गूढार्थप्रेरित आहे.



आक्रा आक्रा बहु आक्रा । काय आक्रा कळेचि ना ।

गुप्त ते, गुप्त जाणावे । आनंदवनभुवनी ॥१७

टीकाकार याबाबत म्हणतात की, या अनुष्टुपाचा अर्थ एक रामदासांना माहीत किंवा त्यांच्या रामरायाला माहीत! तथापि श्री. म. माटे म्हणतात की, हे अनुष्टुप गुप्त मसलतीचे द्योतक आहे. महाभारतात जसे काही कूट श्लोक आहेत, तसाच हा प्रकार आहे. असं म्हणतात की, व्यासांनी प्रत्यक्ष श्रीगणेशांना महाभारताचे लेखन करण्यासाठी पाचारण केले. व्यासांनी श्लोक सांगावा व गजाननाने तो लिहावा, असे ठरले. श्रीगणेशांनी अशी अट घातली की, ते कोठेही थांबणार नाहीत. व्यासांचे निवेदन थांबले तर गजानन लेखणी खाली ठेवतील. त्यावर गुप्त म्हणाले, “ठीक, पण मी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ समजल्यावर मग तो गजाननांनी लिहावा.म्हणून व्यासांनी विचार करायला वेळ मिळावा, यासाठी कूट श्लोक मधूनमधून टाकले की, जे समजायला श्रीगणेशांना वेळ द्यावा लागेल! स्वामींनी आक्रा, आक्रा...या कडव्याचा अर्थ पुढे स्पष्ट केला नाही. उलट गुप्त ते गुप्त जाणावेअसे सांगून गूढार्थ कायम ठेवला. स्वामींनी महंतांचे अकरा-अकराचे गट करून हिंदुस्थानभर त्यांचे जाळे तयार केले होते. त्यांचा जय जय रघुवीर समर्थहा प्रेरक मंत्र अकरा अक्षरी आहे. समर्थांची शिस्त कडवी असे. दूरवर पाठवलेल्या महंतांना अकरा वर्षांतून एकदा चाफळला येऊन आपल्या कार्याचा आढावा स्वामींना द्यावा लागत असे.



स्वामींचा अनेक गुप्त संदेश
११ अंकांशी संबंधित आहेत. त्या गोष्टी गुप्त राहाव्यात, अशीच त्यांची इच्छा दिसते. या सतराव्या कडव्यातील गूढार्थ काय असावा, हे समजायला मार्ग नाही. या कडव्याव्यतिरिक्त इतर कडव्यातील अर्थ दिसायला सरळ असला, तरी तो वाटतो तितका सरळ सोपा नाही, हे अभ्यासकांना माहीत आहे. कारण, ‘आनंदवनभुवनीया काव्यातील वर्णन काशीक्षेत्राला लागू आहे की, तो शिवकालीन महाराष्ट्र आहे, याबाबत अभ्यासकांची मते भिन्न भिन्न आहेत. तीर्थयात्रेच्या काळात स्वामींनी वाराणसी, गया इत्यादी गंगाकाठची रमणीय क्षेत्रे पाहिली होती. काशीविश्वेश्वराचे वैभव तेथील इतर मंदिरे त्यांनी पाहिली होती. देवालये, ऋषिमुनी यांची तपोभूमी, गंगेचे विशाल पात्र, दीपमाळा, रंगमाळा, वेद विद्यांचे अध्ययन क्षेत्र इ. वर्णने काशीक्षेत्राची आठवण करून देणारे आहे. देहत्यागास येणे आनंदवनभुवनी।असे स्वामी म्हणतात. काशीला मरण यावे म्हणजे मुक्ती मिळते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात देहत्यागासाठी यावे, असे कोणी म्हणणार नाही. थोर अभ्यासक शं. श्री. देव म्हणतात की, ‘आनंदवनभुवनया शब्दांचा अर्थ वाराणसी असा घेतला पाहिजे. परंतु, राजवाडे, पांगारकर, माटे या अभ्यासकांना हे मान्य नाही. त्यांचा कल आनंदवनभुवनम्हणजे शिवकालीन महाराष्ट्रअसे मानण्याकडे आहे.



या काव्यात विघ्नांच्या फौजांबरोबर लढण्यासाठी सर्व देवांनी मनावर घेतल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक पुरावे पाहता तसे महाराष्ट्रात घडून आलेले होते
, उत्तरेकडे नाही. भवानीमाता गदा घेऊन भक्तांच्या साहाय्याला युद्धात उतरल्याचा उल्लेख आहे. तुळजापूरची भवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे. याच रामवरदायिनी भवानीमातेने शिवाजी महाराजांना स्वप्नात दृष्टान्त देऊन तलवार दिली होती. याचा अर्थ म्लेच्छांविरुद्धच्या लढाईत भवानी देवीचे साहाय्य होते. रामदास या काव्यात पुढे म्हणतात, ‘बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला । मोडिली मांडिली क्षेत्रे ।पण स्थिती वाराणसीला कधीही झाली नव्हती. तेथे ना औरंग्या बुडाला होता वा ना म्लेंच्छसंहार झाला होता. तिकडे तर औरंगजेबाने इ.स. १६६९ मध्ये हुकूम काढून हिंदूंच्या पाठशाळा, मठ, देवालये, तीर्थक्षेत्रे जमीनदोस्त करावी, असे आदेश दिले होते. त्याच वटहुकूमाने औरंगजेबाने हिंदू कारकूनांना व कारभार्‍यांना बडतर्फ केले होते. या उलट महाराष्ट्रात मात्र म्लेंच्छ दैत्य बुडविण्यासाठी कल्पान्त मांडला होता.



शिवाजी महाराजांचे मावळे म्लेंच्छांचा संहार करीत यश मिळवत होते. पुरंदरच्या तहात औरंगजेबाला दिलेले सिंहगड
, पुरंदर, लोहगड, माहुली इत्यादी 0 किल्ले महाराजांनी एका मागून एक परत मिळवले होते. साल्हेर-मुल्हेरच्या मैदानी लढाईत मराठ्यांनी मुघल सत्तेचा धुव्वा उडवला होता. महाराष्ट्रात औरंगजेब साफ बुडाला होता, म्लेंच्छांचा संहार झाला होता. तीर्थक्षेत्रे निर्भय झाली होती. शिवाजी महाराजांचा हा अलौकिक पराक्रम स्वामी पाहत होते, ऐकत होते. पूर्वी म्लेंच्छ दैत्यांनी गांजलेल्या महाराष्ट्राचे आनंदवनभुवनझालेले स्वामी प्रत्यक्ष पाहत होते. त्या आनंदाचा जो कल्लोळ त्यांच्या मनात उठला होता, तो आनंदवनभुवनीकाव्यातून व्यक्त झाला होता. तेव्हा या काव्यातील मजकूर वाराणसीला लागू पडत नाही. तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या व रामदासांच्या काळातील महाराष्ट्राला लागू पडतो. ल. रा. पांगारकर म्हणतात, “धर्मस्थापनेचे जे महत्कार्य वीर मुत्सद्यांनी केले, त्या कार्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा गौरव समर्थांनी हर्षनिर्भर होऊन आनंदवनभुवनीया काव्यात केला आहे. हे काव्य म्हणजे महाराष्ट्राचे राष्ट्रगीत आहे.

(मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड , ल. रा. पांगारकर)

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@