पुन्हा साधुंची हत्या ! रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020
Total Views |

Sadhu murder case up _1&n
 
 
 
लखनऊ : महाराष्ट्रात पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंगळवारी दोन साधूंचे शव रक्ताच्या थारोळ्यात आढळले आहे. ही घटना अनूपशहर येथील पगोना या गावात घडली आहे. शिव मंदिर येथील परिसरात झोपलेल्या दोन साधूंवर सोमवारी रात्री उशीरा धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली आहे. आरोपी तरुण मुरारी उर्फ राजू याला पोलीसांनी अटक केली असून ग्रामस्थांनी पकडून त्याला पोलीसांच्या हवाली केले आहे.
 
 
 
आरोपी वारंवार अंमली पदार्थांचे सेवन करत असून काही दिवसांपूर्वी साधूंशी एक किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही साधूंनी त्याला सुनावले होते. याच कारणामुळे त्याने हत्या केली आहे, असा आरोप आहे. काही ग्रामस्थांनी त्याला तलवार घेऊन जातानाही पाहिले होती. साधूंच्या हत्येची बातमी समजल्यावर ग्रामस्थांनी त्याच्यावरच आरोप लावला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
 
 
 
बुलंदशहर येथील अनूपशहर कोतवाली येथील पगोना गावात गेल्या १५ वर्षांपासून साधु जगनदास (55) आणि सेवादास (35) मंदिरात पूजा करत होते. मंगळवारी ग्रामस्थ मंदिरात पोहोचले तेव्हा त्याचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.
 
 
 
एसएसपी संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एक तरुण राजू हा नशेत धूंद अवस्थेत तब्बल दोन किमी दूर दूसऱ्या गावात अर्धनग्न अवस्थएत आढळला. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याने साधूंचा चिमटा चोरला होता. त्यावर साधू त्याच्यावर चिडले होते. याच कारणामुळे आरोपीने हत्या केल्याचा संशय आहे.
 
 
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा आढावा घएतला आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनेची विस्तृत माहिती घेतली. घटनेची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जमावाकडून साधूंची हत्या करण्यात आली आहे. पोलीसांनी शंभर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@