पुण्यात पोलिस हल्ल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020
Total Views |
pune_1  H x W:

जखमी कॉन्स्टेबल शंकर काळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात दाखल केला एफआयआर


पुणे : पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी भागात सोमवारी सायंकाळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोपी युनूस अत्तर, त्याची मुले मतीन आणि मोईन सर्व काळेवाडी परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेत जखमी झालेल्या कॉन्स्टेबल शंकर काळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.





एफआयआरनुसार, लॉकडाऊन असताना आपले कर्तव्य बजावत असलेल्या कॉन्स्टेबल शंकर काळकुटे यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यातील काळेवाडी परिसरात लॉकडाऊनचे नियम मोडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युनुसला पाहिले. त्यांनी त्यासंदर्भात विचारणा केली असता युनुस व त्याच्या दोन मुलांनी कलकुटे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. तर त्यातील मतीनने कॉन्स्टेबलवर काठीने हल्ला केला.


भारतीय दंड संहिता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग अधिनियम या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@