'हिंदू' शब्दावर आक्षेप : झारखंड पोलीसांची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
VHP banner_1  H


 
 
 

हिंदू फळविक्रेता, अशी पाटी लावून विकत होता फळे

 
 
झारखंड : विश्व हिंदू परिषद अनुमोदित फळ विक्रेता, अशी पाटी लावून फळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर झारखंड पोलीसांनी कारवाई केली आहे. त्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप लावला जात आहे. दरम्यान भाजपतर्फे या व्यक्तीवरील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले जात असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी पोलीसांनी कारवाई मागे घ्यावी, असा इशारा दिला आहे. अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असे सांगण्यात आले आहे. भाजप राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला हिंदू शब्दाचा इतका विरोध का आहे, असा सवाल त्यांनी सोनिया गांधींना विचारला आहे.
 




 
 
काय आहे नेमके प्रकरण ?
 
 
झारखंडमध्ये एका टरबूजाच्या दुकानाबाहेर एक बॅनर लावण्यात आला होता. एका ठिकाणी श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकराचा फोटो लावण्यात आला होता. 'विश्व हिन्दु परिषद की अनुमोदित हिन्दु फल दुकान'. अशाप्रकारे या बॅनरवर मजकूर झळकत होता. ट्विटरवर एहसान राझी नामक एका युझरने झारखंड पोलीसांना याबद्दलचा फोटो टॅग करत कारवाईची मागणी केली.

कोरोनाच्या संकटात लोकांमध्ये अशा बॅनरमुळे ऐक्याची भावना राहणार नाही. तसेच द्वेष पसरू शकतो त्यामुळे त्वरित कारवाई केली जावी, अशी मागणी राझी याने केली. या प्रकरणी झारखंड पोलीसांनी शोध सुरू केला. फळविक्रेत्याविरोधात कलम १०७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच बॅनरही हटवण्यात आले. दरम्यान, ही कारवाई कुठल्या आधारावर करण्यात आली आहे, असा प्रश्न भाजपतर्फे विचारण्यात येत आहे.झारखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६७ इतकी झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त मजूर रांचीमध्ये आढळले आहेत. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या १३ आहे तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


@@AUTHORINFO_V1@@