मालेगावकरांना दिलासा, ४३९ कोरोना अहवाल निगेटिव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
malegaon_1  H x
 


मालेगाव : राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मालेगावकरांसाठी दिलासा मिळाला आहे. रविवारी तीन कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्याच्या घटनेने थोडाफार दिलासा मिळाला असताना आता सोमवारी शहरातील तब्बल ४३९ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने मालेगावावकरांना दिलासा मिळाला आहे.
 
 
 
प्राप्त झालेल्या एकुण ४४० अहवालांपैकी केवळ एक अहवाल सकारात्मक आला आहे. आतापर्यंत शहरातील कोरोना बाधितांची संख्या १२७ झाली असून कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या १२ झाली आहे. ८ एप्रिल रोजी येथे प्रथम पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोजच बाधितांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तपासणीच्या अहवालाकडे लक्ष असणाऱ्या लोकांच्या मनात एक प्रकारे भीती होती. रविवारी प्राप्त झालेले सर्व दहा अहवाल नकारात्मक आले. पाठोपाठ कोरोनामुक्त झालेल्या तिघा रुग्णांनाही घरी सोडण्यात आल्याच्या बातमीने शहरवासियांना दिलासा मिळाला असतानाच आणखी एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली.
 
 



 
@@AUTHORINFO_V1@@