‘अभी वो जिंदा है!’ किम जोंग उनबद्दल द. कोरियाचा मोठा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |

kim jong_1  H x
नवी दिल्ली : एकीकडे जगामध्ये कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे मात्र उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या मृत्युच्या अफवेची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा पडला असून दक्षिण कोरियाने किम जोंग उन जिवंत असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सांगितले की, “किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत.”
 
गेले काही दिवस किम जोंग उन यांच्या मृत्युच्या बातमीने संपूर्ण जगामध्ये खळबळ माजली होती. उत्तर कोरियाचे संस्थापक आणि त्यांचे आजोबा किम इल-सुंग यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही किम जोंग उन यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती.
 
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता उत्तर कोरियाकडून काही अधिकृत माहिती जाहीर होते का? याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@