चिपळूणच्या वनाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ८७ हजारांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
 forest _1  H x
 
 

मार्च महिन्याचे वेतन निधीला दिले

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोरोनाच्या संकाटात राज्य सरकारला हातभार म्हणून वन विभागाच्या चिपळूण वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ८७ हजार रुपयांची मदत केली आहे. मार्च महिन्याचे वेतन त्यांनी निधीला दिले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि वनपालांचा समावेश आहे.
 
 
 
 
कोरोनाच्या विरुद् लढण्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हातभार लावला आहे. चिपळूण वनपरिक्षेत्रातील सात वनाधिकाऱ्यांनी त्यांचे मार्च महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला दिले आहे. एकूण १ लाख ८७ हजार २७४ रुपयांची रक्कमेचा धनादेश त्यांनी आज चिपळूणच्या तहसिलदारांकडे सुपूर्द केला. या अधिकाऱ्यांमध्ये चिपूळणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन निलख, वन विभागाचे 'क्राॅकोडाईल मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले आवलोलीचे वनरक्षक रामदास खोत, सावर्डेच्या वनपाल राजश्री किर, रामपूरचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, गुढेच्या वनरक्षक गंगुबाई मडके, नांदगावचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर आणि रानवीचे वनरक्षक सुरज तेली यांचा समावेश आहे. या मदतीनेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी निलख यांनी ५२, ३८४ रुपये, किर यांनी ३२,९१९ रुपये, सु्र्वेंनी ३२,०३९ रुपये, खोत यांनी २५, १६१ रुपये, मडकेंनी २३, ७४४ रुपये, बंबर्गेकर आणि तेलींनी प्रत्येकी १० हजार रुपयांचा हातभार लावल्याची माहिती वनरक्षक रामदास खोत यांनी दिली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@