कोरोना कहर (भाग-६)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |

 


homeopathy_1  H
 

कोरोना व्हायरसच्या या साथीमध्ये होमियोपॅथीचे उपचार हे अत्यंत गुणकारी आणि वरदान ठरले आहेत. या उपचारांबद्दल आपण माहिती विस्तृतपणे घेणारच आहोत. परंतु, त्याआधी आपण पाहूया की, हा ‘साथीचा रोग’ म्हणजे नक्की काय असतो?
 

 

"Epidemic' अर्थात ‘साथीचा आजार.’ हा शब्द मूळ ‘एळिवशाशश्रेप’ या शब्दावरून आलेला आहे, जो प्राचीन चिकित्सक व विचारवंत हिपोक्रॅटीस यांनी वापरला होता. जेव्हा एकच आजार लोकांमध्ये पसरला होता, त्यावेळी त्यांनी ही संज्ञा वापरली होती. आजाराची गणना साथीच्या रोगात होते, ज्यावेळी रोगाचा प्रादुर्भाव हा एकच जीवाणू, विषाणू वा इतर रोगकारक घटकांमुळे होत असतो आणि त्याचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये होत असतो. अशा आजाराचा संसर्ग एकाच वेळी होतो.
 
साथीचा आजार जेव्हा बळावतो, त्यावेळी या महामारीत प्रत्येक वैयक्तिक केसचा अभ्यास करण्याकरिता वेळ नसतो. कारण, साथीचा आजार हा घातक असू शकतो. जसा ‘कोविड १९’ आहे. अशावेळी होणार्‍या आजाराच्या सर्व लक्षणांचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी या साथींचा अभ्यास करून त्यासाठी औषध कसे शोधावे, याचे मार्गदर्शन केले आहे. ज्याप्रमाणे अ‍ॅलोपॅथीला ‘अ‍ॅलोपॅथी’ हे नाव सर्वप्रथम डॉ. हॅनेमान यांनी दिले, त्याचप्रमाणे साथीच्या आजाराचे जे औषध असते, त्याला ‘जिनस एपिडेमिक्स’ (Genus Epidemicus) हे नावसुद्धा होमियोपॅथीच्या जनकांनीच दिले आहे. आता आपण पाहू की, हे Genus Epidemicus म्हणजे काय? साथीच्या आजारामध्ये सर्व रुग्णांमध्ये दिसणारी प्रमुख व महत्त्वाची सर्व लक्षणे एकत्र करून त्याचा एक ‘पॅटर्न’ असतो, तो अभ्यासला जातो व त्या सर्व लक्षणांवरून या साथीच्या आजारामध्ये रुग्णांमध्ये अजूनही काही वेगळी लक्षणे दिसतात का, ते पाहून त्यावरून एक कॉमन औषध ठरवले जाते, त्यास ‘जिनस एपिडेमिक्स’ असे म्हणतात.

 

 


 
‘जिनस एपिडेमिक्स’ हे औषध दोन प्रकारे काम करते. जे लोक या साथीच्या आजाराने आजारी आहेत, त्यांना हे औषध रोगमुक्त करते व जे लोक आजारी नाहीत, पण, ‘हाय रिस्क’ म्हणजे संसर्ग होण्याच्या पातळीवर आहेत, त्यांना संसर्ग होऊ देत नाही. हे औषध रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून येणार्‍या संसर्गाला परावृत्त करते आणि तेही नैसर्गिकरित्या आणि कुठल्याही लसीशिवाय! होमियोपॅथीच्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात परिच्छेद क्रमांक १००, १०१ आणि १०२ मध्ये डॉ. हॅनेमान यांनी या साथीच्या आजाराचे औषध कसे शोधायचे, त्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. नुसते औषध शोधून उपयोग नाही, तर त्याचबरोबर आहार-विहार, आचार-विचार यांचेही बंधन पाळायचे असते. आपण त्याबद्दलही पुढील भागांमध्ये सविस्तररीत्या माहिती पाहाणारच आहोत. पण, पुढील भागात आपण होमियोपॅथीची कुठली औषधे ‘कोविड १९’ या आजारावर प्रभावी आहेत, त्याचीही माहिती करुन घेऊया. (क्रमशः)

 

 


- डॉ. मंदार पाटकर

 

@@AUTHORINFO_V1@@