पोलीस युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचा बचाव करत असल्याचा अर्णब यांचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
Arnab-Goswami _1 &nb
 
 
 
 
 
मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामीने पत्राद्वारे पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा बचाव करत असल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहीत त्यांनी हे आरोप लावले आहेत. मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी अर्णब गोस्वामी यांनी स्वतःवर झालेल्या हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दोन युथ काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
 
 
 
अर्णब पत्रात म्हणतात...एका राष्ट्रीय पक्षाचा या हल्ल्यात एक वाटा आहे. याकडे पोलीस तपासात डोळेझाक होत आहे. एफआयआरमध्ये केवळ दोन काँग्रेसच्या आरोपींचीच नावे आहेत. त्यांना हा गुन्हा करायला प्रवृत्त करणाऱ्यांचे नाव यात का नाही, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे, तक्रार करताना सर्व संशयितांची माहिती तक्रारीत दिली होती. अर्णबच्या सुरक्षा अधिकक्षकानेही या तक्रारीवर स्वाक्षरी केली होती.
 
 
 
‘रिपब्लिक टीव्ही’तर्फे पोलीसांना काही पुरावे सादर करण्यात आले होते. तेही एफआयआरमध्ये हटवण्यात आले असल्याचा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या वाहनावर जो द्रवरुपी पदार्थ फेकण्यात आला तो अॅसीड किंवा ज्वलनशील पदार्थ असल्याचा आरोप करण्यात आला मात्र, पोलीसांनी त्यातही कुठल्या प्रकारची तपासणी केलीच नाही, असा दावा अर्णब यांनी केला आहे. त्यांच्या परिवारावर झालेला हल्ला पाहता योग्य आणि कठोर कलमे आरोपींवर लावण्यात आली नाहीत, असेही म्हटले आहे.
 
 
 
अर्नब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर जो हल्ला झाला तो त्यांच्या घरापासून पाचशे मीटर दूर अंतरावर हा हल्ला झाला. २३ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता हा हल्ला त्यांच्या टोयोटा कारवर झाला. दोन्ही आरोपींना त्यांच्या काँग्रेसी अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले आहे, अशी कबुली त्यांनी दिल्याचेही अर्णब यांनी सांगितले आहे. यापूर्वी अर्णब गोस्वामी यांना बारा तासांत दोन नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. सोनिया गांधी पालघर प्रकरणावर गप्प का, असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@