'मी पण हरजीत सिंह' ८० हजार पोलीसांनी चढवला बॅच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
Harjit Singh_1  




अभिमानास्पद ! असा सन्मान आजवर कुठल्याही पोलीसाला मिळाला नसेल !

पतियाळा : ‘मैं वी हां हरजीत सिंह’ म्हणजेच 'मी पण हरजीत सिंह' असा नारा देत ८० हजार पंजाब पोलीसांनी याच नावाचा बॅच स्वतःच्या वर्दीवर चढवला होता. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये लॉकडाऊनचे आदेश धुकडावणाऱ्या एकाने पंजाब पोलीस दलात असलेल्या हरजीत सिंह यांचा हात तलवारीने छाटला होता. तुटलेला हात तसाच घेऊन ते रुग्णालयात गेले होते. तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी हात पुन्हा बसवला होता. हरजित सिंह सध्या उपचार घेत आहेत. मात्र, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ८० हजार पोलीसांनी अनोख्या पद्धतीने सलाम केला.
 
 
 
डीजीपी दिनकर गुप्ता यांनीही आपल्या वर्दीवर हरजीत सिंहचा बॅच चढवला होता. हरजीत यांच्यावर सध्या चंदीगड येथील पीजीआय येथे उपचार सुरू आहेत. १२ एप्रिल रोजी पतियाळा येथे कर्फ्यू दरम्यान उसळलेल्या हिंसाचारात त्यांनी आपला हात गमावला. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रीयेनंतर आता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
 
 
 
हरजीत यांच्या या कार्याची दखल घेतल मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनीही त्यांना पदोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवादही साधला होता व त्यांच्या शौर्याल सलामही केला होता. सोमवारी सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वर्दीवर हरजीत सिंह यांचा बॅच चढवत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
 
 
डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले, "संकटकाळात पोलीसांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच जनतेलाही आमचे सांगणे आहे की, आम्हाला सहकार्य करा. कोरोनाशी लढण्यासाठी युद्धभूमीवर तैनात असलेल्या डॉक्टर आणि पोलीसांच्या पाठीशी जनतेने उभे राहण्याची गरज आहे.
 
 
गुजरातचे डीजीपी म्हणतात, "पंजाब पोलीस दलातील एसआय हरजीत सिंह कोरोनाच्या लढाईत संपूर्ण देशभरातील पोलीसांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. तणावाच्या स्थितीत कर्तव्य आणि शांतीसाठी पोलीसांनी वेळोवेळी आपले सर्वश्रेष्ठ योगदान दिले आहे. हरजित सिंह लवकर ठिक व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो.
 
 
 
असा सन्मान मला मिळेल, याचा विचारही केला नव्हता : हरजीत सिंह
 
"मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, मला कधीही असा सन्मान मिळू शकेल. हे मला आयुष्यभरासाठी कामी येईल. माझ्या सर्व वरिष्ठांचा मी आभारी आहे. मी आयुष्यात असा कुणाला सन्मान मिळाल्याचे पाहिले नाही.", असे हरजीत सिंह म्हणाले. दरम्यान, त्याची प्रकृती आता सुधारत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@