कल्याण डोंबिवलीत एकूण १३७ रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
Kalyan_1  H x W 
 
 
 
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्या आठ कोरोना रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १३७ झाली आहे. कोरोना लागण होणाऱ्या या रुग्णांमध्ये मुंबईत काम करणारे आहेत. त्यांचा संबंंध कोरोनाबाधितांशी आला आहे.  
 
 
सोमवारी आढळलेल्या नवीन ८ रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या मुंबई येथील शासकीय परिवहनचा ३८ वर्षीय पुरुष ड्रायव्‍हरचा, कल्याण पश्चिमेतील मुंबई येथील खाजगी बॅंकेचा २१ वर्षीय पुरुष कर्मचारी, कल्याण पूर्वेतील मुंबई येथील खासगी रुग्‍णालयातील ३४ वर्षीय पुरुष कर्मचारी, डोंबिवली पश्चिमेतील १३ वर्षीय मुलगा आणि ४८ वर्षीय महिला, तर मोहने येथील ७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिला हे चौघे कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासीत आहेत. तर डोंबिवली पश्चिमेतील खाजगी रुग्णालयातील ४० वर्षीय कर्मचारी यांचा समावेश आहे.
 
 
 
नवीन ८ रूग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण संख्या १३७ झाली असून या रुग्णांपैकी ३ मृत तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. आत्‍तापर्यंत ४९९८ रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन केलेले असून ९६ रुग्‍ण इस्‍टीटयुशनल क्‍वारंटाईनमध्‍ये आहेत.
 
 
 
रुग्णांची एकूण संख्या
 
कल्याण पूर्व -२८, कल्याण पश्चिम -१६, डोंबिवली पूर्व – ४८, डोंबिवली पश्चिम -३५, मांडा टिटवाळा -५, मोहने -५
@@AUTHORINFO_V1@@