क्रोध, भीती दूर ठेवून काम करण्याची गरज : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020
Total Views |
Dr Mohan ji Bhagawat_1&nb
 
 
 
नागपूर : धर्माचे रक्षक, धर्माचे पूजक असलेल्या आणि कुठलाही अपराध नसललेल्या निर्दोष साधूंची पालघरमध्ये हत्या झाली. अशाप्रकारे कायदा हातात घेणे योग्य आहे का ?, पोलीस कायदा सुव्यवस्था त्यावेळी काय करत होती?, असे प्रश्न धर्म म्हणून प्रत्येकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. मात्र, याबद्दल मनात किंतू परंतू बाजूला ठेवून, स्वार्थाची भावना बाजूला ठेवून संकटकाळात देशाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. मनातील सर्व शंका दूर ठेवून सकारात्मकरीत्या पुढे जायला हवे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पालघर साधू हत्या प्रकरणावर व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान त्यांनी हे मत व्यक्त करत कोरोना महामारीशी कसे लढावे यासाठी देशभरातील नागरिकांना व संघ स्वयंसेवकांना संबोधित केले.
 
 
 
 
डॉ. भागवत म्हणाले, "पालघर साधूंच्या हत्येचे काही लोकांनी स्वार्थापोटी लोकांना भडकवण्याचे काम केले, राजकारणही केले. माथी भडकवण्याचे कामही झाले. मात्र, अशामुळे आपण देशाचे नागरिक म्हणून त्यांच्या कटात अडकू नये याची काळजीही घ्यायला हवी. भय किंवा क्रोधाच्या कृत्यांमध्ये सुजाण नागरिकांनी पडू नयेत. पालघरमध्ये ज्या प्रकारे साधूंची हत्या झाली, त्यावर प्रतिक्रीया येत आहेत हा भाग वेगळा. दोन धर्माच्या साधूंची अमानुष हत्या होणे याचे दुःख सर्वांनाच आहे. मात्र, या गोष्टींचा फायदा क्रोध आणि भीती पसरवणाऱ्या शक्ती घेत नाहीत ना याचाही विचार व्हायला हवा. २८ एप्रिल रोजी या साधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि संत महंतांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे."
 
 
 
 
बौद्धिक वर्गाची सुरुवात करताना ते म्हणाले, "संघवर्ग शाखावर्गातील काम स्थगित असले तरी संघ स्वयंसेवक आपापल्या परिवारासह एकत्र देशाला संकटमुक्त करण्यासाठी प्रार्थना करत आहेत. रा.स्व.संघाचे सेवाकार्य अखंड सुरू आहे. कोरोनाच्या काळात जिथे गरज भासेल त्या ठिकाणी देशभरातून स्वयंसेवक आपली मदत पोहोचवत आहेत. सेवेची प्रेरणा ही आपल्या स्वार्थासाठी नव्हे, आपला डंका वाजवण्यासाठी हे काम नाही, हे काम आपल्या देशासाठी आहे. स्वार्थ, भय, भीती किंवा अहंकार या गोष्टी दूर सारून हे कार्य करणे हेच आमचे ध्येय आहे. संघकार्याला दिली जाणारी प्रसिद्धी किंवा त्याची माहिती प्रसारित करणे म्हणजे स्वतःचा डंका वाचवणे नसून या कार्यात सहभागी होणाऱ्यांसाठी तसेच त्याचा लाभ घेणाऱ्यांसाठी आहे."
 
 
 
 
'कोरोनाच्या संकटापुढे भयभीत होण्याची गरज नसून त्याविरोधात सातत्यता राखून लढण्याची गरज आहे. भीतीमुळे संकटाचे बळ आणखी वाढते. कोरोनाचे संकट जगासाठी नवे आहे. त्यामुळे होणारे नुकसान हे अनुभवानंतरच पुढे येत आहे. त्यामुळे शिस्तबद्ध राहून त्याविरोधात लढणे करण्याची गरज होते. प्रयत्नांचे सातत्य करत राहायलाच हवे. या रोगाशी जे कुणी पीडित आहेत. ते आपलेच आहेत. भारत सरकारनेही औषधांवरील निर्यातबंदी उठवून ज्या ज्या देशांना शक्य आहे, त्यांना औषधे पोहोचवली आहेत. किंबहूना स्वतःचे नुकसान होऊनही इतरांना मदत केली आहे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हे सेवाकार्य आहे, ते चांगलेच व्हायला हवे. आपापल्या परीने प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे, संघटीत होऊन सामुहीकरित्या एकत्र येणे गरजेचे आहे. त्यापूर्वी स्वतः खंबीर राहणे गरजेचे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. आयुष मंत्रालयाने ज्या प्रकारे काढा सेवन करण्याचे आवाहन केले आहे, त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कुणीही मदतीपासून वंचित राहता कामा नये, कुणी धूर्तपणे मदत हिसकावून पळ काढत तर नाही ना याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे', असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
स्वयंशिस्त दाखवण्याची गरज
 
 
 
'काही लोकांच्या सवयीमुळे हा रोग जास्त वाढत आहे, असाही अनुभव आपण घेतला आहे. त्यांचे प्रबोधनही गरजेचे आहे. जिथे शिस्तबद्ध पद्धतीने लॉकडाऊनचे आणि सूचनांचे पालन झाले तिथे रोगाचा प्रादुर्भावही कमी झाला. मानवाने सहा दोषांचे हनन केले पाहिजे. निद्रा, तद्रा, भय, क्रोध, आलस्य व दीर्घसूत्रता या दोषांना दूर ठेवून काम करण्याची गरज आहे. आळस आणि विलंब दूर ठेवून तत्परतेने या काळात ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या केल्याच पाहिजेत. लॉकडाऊन काळात घातलेल्या निर्बंधांमुळे अनेकांना रागही येऊ शकतो, याचा प्रत्ययही काहीवेळा आला. त्यामुळे कुणाच्याही भीती किंवा भडकवण्यात न येता या निर्बंधांचे पालन करायला हवे.', असे डॉ. भागवत यांनी आवाहन केले आहे.
 
 
 
कुटूंब संस्कारांची गरज
 
 
'लोकांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी योग, प्राणायमांचे नित्यनियमित आचरण व्हायला हवे. कुटूंबात संस्काराचे वातावरण असणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारच्या तणावाखाली न येते धैर्य गंभीरतेने सामोरे जाण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट गेल्या काही दशकांपैकी आलेले पहिलेच संकट आहे. यापूर्वी अशाप्रकारची जागतिक महामारी कित्येक वर्षांपूर्वी क्वचितच आली असेल. हे संकट आपल्याला स्वावलंबितत्व शिकवून गेले आहे. या संकटाने आपल्या राष्ट्र पूर्ननिर्माणच्या कार्यकाळासाठी काय शिकवण दिली याचाही विचार व्हायला हवा. देशभरातील विस्थापित मजूर जे आपापल्या गावात गेले आहेत, ते सर्वच पुन्हा एकत्र येतील का ? जर नाही तर त्यांच्या रोजगाराचे काय ?, याचाही विचार व्हायला हवा. या संकटकाळात कमी झालेला पर्यावरण ऱ्हासही लक्षात ठेवून यापुढे तोही विचार करायला हवा. स्वावलंबन आणि स्वदेशीचा वापर, विदेशातील संसाधनांचा कमी वापर व त्याला पर्यायी उत्कृष्ट उत्पादनाची निर्माती करण्याची गरज सध्या प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक पातळीवर करण्याची गरज आहे', असेही ते म्हणाले.
 
 
 
पर्यावरणाच्या ऱ्हासाचा विचार व्हावा !
 
'पर्यावरणात गेल्या काही दिवासांपासून बदल जाणवत आहेत, ते सकारात्मक आहेत. लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या जनजीनामुळे आपण पुन्हा निसर्गाची हानी करणार नाही ना, त्यासाठी कमीतकमी उर्जास्त्रोतांचा वापर करता येईल का ?, त्याचाही विचार करायला हवा. नागरिक अनुषासन पालन हा देखील दीर्घकालीन आचरणात आणण्यासारखा मुद्दा आहे. शासन-प्रशासन समाजोन्मुभिमुख कार्य करेल, राजकारणात जेव्हा समाजहीत समोर ठेवून कार्य होईल, तेव्हाच एक बदल जाणवेल. कोरोनाच्या संकटात राष्ट्र जगाला दिशा दाखवणारे ठरेल, आपली भूमीका कायम संकटकाळात जगाला आधारस्तंभ वाटणारे ठरणाऱ्या राष्ट्राचा निर्माण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.






 
@@AUTHORINFO_V1@@