उठा... उठा...जागे व्हा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020   
Total Views |
UT_1  H x W: 0
 
 
 
 

जाऊ कहाँ बताए दिल
दुनिया बडी है संगदिल...
चांदनी आयी घर जलाने 
सुझेना कोई मंजिल ॥
 
 
 
 
कोरोनाच्या काळात आज महाराष्ट्रातल्या कष्टकरी, गोरगरिबांची हीच स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात त्यातही खासकरुन मुंबईती कष्टकर्‍यांचे वर्णन करायचे असेल तर ‘वाटोळे’ हा एकच शब्द पर्याप्त आहे. आता कुणी म्हणेल संकटाच्या काळात धीर द्यायचा तर हे काय रडगाणे चालले आहे. पण, हे रडगाणे करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक गोष्ट सांगाविशी वाटते. एक राज्य होते, तिथे एक जण इतर लबाडांच्या मदतीने जनमताला लाथाडून राजसत्ता हस्तगत करतो. त्याला वाटते, राजा बनले की झाले. पण, तसे होत नाही. राज्यात मोठे संकट येते. राजा या संकटकाळात काय करतो, तर दररोज प्रसारमाध्यमांतून संकटाला कसे घराबाहेर ठेवावे, ते जनतेला सांगतो. खरेतर जनता या संकटकाळात काय मरणयातना भोगत असेल, याची राजाला जाणीव असणे शक्यच नव्हते. मात्र, या काळात राजाचे ‘जी हुजूरी’ करणारे त्याला खोटेच सांगत, “वा वा महाराज, आपणच नंबर वन आहोत बरं.” मुळात राजा साधाच होता. त्याला लबाडांचे म्हणणे खरे वाटायचे. लबाड मात्र स्पष्टीरण द्यायचे. नरोवा कुंजरोवा. आम्ही राजाला सांगतो आपणच ‘नंबर १’ आहोत. पण, कशात ‘नंबर १’ आहोत ते कुठे सांगतोय? ‘नंबर १’ आहोत म्हणजे संकटात त्राही त्राही होण्यामध्ये आपले राज्य ‘नंबर १’ असू शकते किंवा संकटग्रस्त परिस्थिती हाताळण्यामध्ये आपण सपशेल अपयशी ठरलो, यात ‘नंबर १’ आहोत, असेही असू शकते. आता राजाला वाटते की, आपण चांगले काम करण्यामध्ये ‘नंबर १’ आहेात, तर आम्ही काय करणार? तर अशीही गोष्ट! तर सध्या राज्यात असे काही होते आहे का? जर हीच कहाणी वास्तवात घडत असेल तर सद्यस्थिती कथन करणारे रडगाणे, तक्रारीचे पाढे गायलाच हवेत. राजाला वास्तवाची जाणीव करून द्यायलाच हवी. गोऽगोड स्तुतीच्या नाटकी गोळ्या देऊन राज्य कोरोनाला हरवू शकत नाही. कुठेतरी कुणीतरी खरेही बोलायला हवे. उठा..उठा...जागे व्हा!
 
 

उठा! यांचाही विचार करूया!

 
 
 
केंद्र सरकारचे पथक नुकतेच मुंबईला आले होते. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना प्रसार थांबवायचा असेल, तर झोपडपट्ट्यामंध्ये वैयक्तिक ‘क्वारंटाईन’ पेक्षा ‘इन्स्ट्यिूशनल क्वारंटाईन’ व्हावे, अशी या पथकाने राज्य सरकारला सूचना केली आहे. हातावरती पोट असणारे, झोपडपट्टीत दाटीवाटीने राहणारे हे आपलेच बांधव. देशाच्या स्थितीगतीमध्ये याच सेवावस्तीत राहणार्‍यांचे योगदान मोठे असते. आज या सेवावस्त्यांमध्ये कोरोना मात्र निर्दयीपणे पोहोचला आहे. जगणार कोण? जो स्वत:ला जगवू शकतो तोच... हा जंगलाचा नियम आज कोरोनाच्या हाहाकारात राक्षसी रूपात प्रकट झाला आहे. सेवावस्तीतल्या बांधवांना, भगिनींना कळत नाही की नेमके काय झाले आहे? तोंड बांधून बसायचे आहे, इतकेच त्यांना माहिती! अंगावर घालायला धड कपडे नाहीत. असले तरी पाण्याच्या अभावाने मळलेले सळलेले. इथे तोंड कसे बांधणार? पण, तरीही पदराने आयाबाया तोंड बांधतात, पुरूष मंडळी फडक्याने, रूमालाने तोंडं झाकतात. पण, त्यांच्या डोळ्यातले ते असाहाय्य भाव तर झाकेल जात नाहीत ना? इथे प्यायचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे ‘हॅण्डवॉश चॅलेन्ज’ परवडत नाही आणि दररोज सकाळी सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी गर्दी करावीच लागते. इतकी की सार्वजनिक शौचालयाचे एक भांडे २०० ते ३०० वेळा दररोज वापरले जाते. इथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणार कसे? ‘लॉकडाऊन’मुळे कामधंदे बंद आहेत. या सगळ्यांचे साहेब, बाईसाहेबच कोरोनामुळे घरी बसलेत. जिथे साहेब लोक घरी बसले तिथे आमचे काय होणार, ही भीती त्यांची पाठ सोडत नाही. जे परराज्यातील कामगार मजदूर इथे कामाच्या ठिकाणीच राहतात आणि रात्री तिथेच पथारी टाकतात त्यांचे काय? परराज्यात असलेल्या घरवालीशी, कच्च्याबच्च्यांशी फोनवर बोलणे हाच त्यांचा एकमेव आधार. पण, आज फोन रिचार्ज संपला आहे आणि रिचार्जची दुकाने बंद आहेत. आपण जीवंत आहोत का की आपल्या घरातले कसे आहेत, हे कळायला त्यांना मार्ग नाही. पोटाला अन्न नाही, आपल्याच माणसांशी संपर्क नाही. या सगळ्यांची मानसिक स्थिती कशी असेल? झोपडपट्टीत राहणारे, मोलमजुरी करणारीही माणसचं आहेत. केंद्राकडून किती आले याचा विचार नंतर करा. उठा! माणुसकीने यांचाही विचार करूया!
 
@@AUTHORINFO_V1@@