अमिताभ बच्चन यांना समजवा की, वटवाघळांमुळे 'कोरोना' होत नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020
Total Views |
bats_1  H x W:

 

बच्चन यांच्या टि्व्टवर पर्यावरणप्रेमींचा संताप
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी केलेल्या एका टि्व्टवरुन पर्यावरणप्रेमींनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. माझ्या रुममध्ये शिरलेल्या वटवाघळाला आम्ही घराबाहेर काढले असून हा कोरोनो पाठलाग सोडतच नाही, अशा आशयाचे टि्व्ट त्यांनी केले होते. वटवाघळांमुळे कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या अजूनही सिद्ध झालेले नाही. अशा परिस्थितीत बच्चन यांचे हे टि्व्ट वटवाघळांविषयी गैरसमज पसरवणारे असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
 
 
 
 
वटवाघूळ हा जगातील एकमेव उडणारा सस्तन प्राणी आहे. जगभरात वटवाघळांच्या १०१३ जाती आहेत. त्यापैकी भारतात १२३ जाती आढळतात. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक वटवाघळांच्या प्रजातींचा अधिवास आहे. यामधील २० टक्के वटवाघळे ही फलाहारी आहेत आणि ८० टक्के कीटकभक्षी. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संक्रमणाला वटवाघळाला दोषी ठरविले जात आहे. मात्र, अजूनही तसे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. यामध्येच महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी वटवाघळांचा संबंध कोरोना संक्रमणाशी जोडून त्यासंबंधी टि्व्ट केले. त्यांनी या टि्व्टमध्ये म्हटले आहे की, 'ब्रेकिंग न्यूज.. जलसा बंगल्यामध्ये मी राहत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत वटवाघूळ आले. मोठ्या मेहनतीने आम्ही त्याला घराबाहेर काढले. हा कोरोना पाठलाग सोडत नाही आहे'. यामध्ये बच्चन यांनी कोरोनाचा संबंध वटवाघूळांशी लावून गैरसमज पसरवल्याने देशातील काही उच्चपदस्थ वनअधिकाऱ्यांनी त्यांना रिल्पाय देऊन टि्व्ट मागे घेण्याची विनंती केली. मात्र, बच्चन यांनी अजूनही हे टि्व्ट काढलेले नाही.
 
 
 
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने (आयसीएमआर) प्रसिद्ध केलेल्या अहवालात दक्षिण भारतातील काही वटवाघळांमध्ये कोरोना सदृश विषाणू आढळल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी या विषाणूंचा माणसांमध्ये आढळलेल्या 'कोव्हिड-19' विषाणूंशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. वटवाघळांमधून माणसांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे किंवा त्यांच्या मलमूत्रामार्गे माणसाला कोरोनाची बाधा झाल्याचे अजूनही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. याविषयी आम्ही वटवाघूळ तज्ज्ञ डाॅ. महेश गायकवाड यांना विचारले असता त्यांनी बच्चन यांच्या टि्व्टबद्दल नाराजी व्यक्त केली. आधीच समाजात वटवाघळांविषयी बऱ्याच गैरसमजूती आहेत. अशावेळी समाजावर प्रभाव पाडणारा व्यक्तीने अभ्यास न करता एखादे विधान केल्यावर त्याचा समाजावर परिणाम पडतो. त्यामुळे बच्चन यांचे हे टि्व्ट नक्कीच आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
 
वटवाघूळ आणि मिथक
 
वटवाघूळ हा निरुपयोगी प्राणी आहे ?
वटवाघूळ हापर्यावरणीय संस्थेतील महत्त्वाचा प्राणी आहे. फलहारीवटवटवाघांमुळे फळझाडांच्या बिया आणि परागकणांचा प्रसार होतो. जंगलांच्यापुनरुज्जीवनासाठी त्याची आवश्यकता असते. कीटक भक्षीवटवाघळांमुळे कीटकांची संख्या नियंत्रणात राहते.
 
 
वटवाघूळ माणसांवर हल्ला करतो ?
वटवाघळे माणसांवर हल्ला करीत नाहीत किंवा डोळेही काढून नेत नाहीत. माणसांपेक्षा आकाराने दहापट लहान असणार्‍या या प्राण्यांची माणसावर हल्ला करण्याची क्षमता नसते.
 
 
वटवाघूळ माणसाचे रक्त पितो ?
दक्षिण अमेरिका आणि मेस्किकोमध्ये आढळून येणारी रक्तशोषक वटवाघळे केवळ प्राण्यांचे रक्त पितात. मनुष्याचे नाही. तेआपल्या दातांनी प्राण्याच्या शरीरावर छोटासा दंशकरतात. त्यातून रक्त साकळनरोधी (अँटीकाँग्युलंट) द्रव्य सोडतात. त्यानंतर त्या प्राण्यांच्यारक्ताचे शोषण करतात आणि हे त्या प्राण्याच्या लक्षातही येत नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@