लाॅकडाऊनमध्ये आफ्रिकेत गोरिलांचे रक्षण करणाऱ्या १२ वनरक्षकांची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2020
Total Views |
gorila_1  H x W
 
 

गोरिलांचे संवर्धन संकटात

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आफ्रिकेमधील डेमोक्रेटीक रिपब्लिक आॅफ काॅंगोमधील विरुंगा राष्ट्रीय उद्यानातील १२ वनरक्षकांची लाॅकडाऊनमध्ये हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रवांडा प्रातांतील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात माऊंटन गोरिला प्रजातीचे रक्षण करणारे १२ वनरक्षक ठार झाले. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आफ्रिकेतील विरुंगा राष्ट्रीय उद्यान बंद आहे.
 
 
 

gorila_1  H x W 
 
 
विरुंगा राष्ट्रीय उद्यान हे आफ्रिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. माऊटंन गोरिलांच्या अधिवास या राष्ट्रीय उद्यानात आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण परिसर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. अशा या निसर्गाने संप्पन असणाऱ्या उद्यानातील १२ वनरक्षकांची शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात हत्या झाली. काॅंगोच्या शेजारी असणाऱ्या रवांडा प्रातांतील ६० बंडखोर सैनिकांनी विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारी असणाऱ्या गावांमधील नागरिकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यापासून नागरिकांचे रक्षण करण्याचे काम विरुंग्यामधील वनरक्षक करत होते. गेल्या काही वर्षांमध्ये या राष्ट्रीय उद्यानातील गोरिला संवर्धनाला शिकारी आणि याठिकाणी होणाऱ्या यादवी युद्धामुळे धोका निर्माण झाला आहे. या सर्व संकटांमधून गोरिलांचे रक्षण करण्याचे काम हे वनरक्षक करत होते. या वनरक्षकांच्या मृत्यूमुळे उद्यान प्रशासनासमोर गोरिला संवर्धनाचे संकट उभे राहिले आहे.
 
 
 
 
विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “विरुंग्याचे वनरक्षक या प्राणघातक हल्ल्याचे लक्ष्य नव्हते. परंतु, स्थानिकांच्या बचावासाठी झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी आपले प्राण गमावले.” यापूर्वी देखील २०१८ मध्ये बंडखोरांनी विरुंगा राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी आलेल्या दोन ब्रिटीश पर्यटकांचे अपहरण केले होते. यावेळी झालेल्या हल्ल्यात राहेल मासिका बराक या वनरक्षकांची हत्या झाली होती. विरुंगा राष्ट्रीय उद्यान हे युगांडा आणि रवांडा प्रांताच्या सीमेवर ७ हजार ८०० चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे. १९७९ मध्ये त्याची स्थापना झाली.
@@AUTHORINFO_V1@@