पुन्हा एकदा पाकमध्ये दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2020
Total Views |
 
pak_1  H x W: 0
 
 
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाच्या संसर्गाने हैराण आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फटका पाकिस्तानलाही बसला आहे. मात्र, यादरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये २ अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ही घटना आहे. या भागातील प्रभावशाली नेते आणि पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य पीर फैसल शाह जिलानीचा भाऊ याच्यावर या २ बहिणींचे अपहरण केल्याचा आरोप पिडीत कुटुंबाने केला आहे. अनेकवेळा पाकिस्तानमधील हिंदू लोकांवर अत्याचार होत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे.
  
 
 
 
 
 
न्याय मिळावा म्हणून अपहरण झालेल्या पिडीत कुटुंबाने एक व्हिडियो प्रसिध्द केला. यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नेत्याच्या भावाने ‘मुलींचे धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करू’ अशी धमकी या पिडीत परिवाराला दिली आहे. या कुटुंबाला पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याआधीदेखील पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचा छळ करण्याबद्दल भारतासह अनेक देशांनी त्यांना धारेवर धरले होते. मात्र, कोरोनाच्या काळातही हिंदू व ख्रिश्चनांना रेशन न दिल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे पाकिस्तानचे नापाक कामे पुन्हा एकदा समोर आली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@