पेंग्विनच्या दहा प्रजाती नामशेष होण्याच्या दिशेने !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2020   
Total Views |
penguine_1  H x


संयुक्त राष्ट्र संघाच्या 'आययूसीएन' संस्थेची माहिती

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - आजच्या 'जागतिक पेंग्विन दिवसा'च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या 'इंटरनॅशलन युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर' (आययूसीेएन) या संस्थेने पेंग्विनच्या १० प्रजाती नामशेष होण्याचा धोका वर्तवला आहे. हवामान बदलामुळे पेंग्विनचे अधिवास नष्ट होत आहेत. जगात पेंग्विनच्या १८ प्रजाती आढळत असून या सर्वांचा समावेश 'आययूसीएन'च्या संकटग्रस्त प्राणी प्रजातींच्या लाल यादीत करण्यात आला आहे. 
 
 
 
 
 
 
  
पेंग्विन्सच्या अधिवासातील वातावरणाचे ’अंटार्क्टिक’, ’सब-अंटार्क्टिक’ आणि ’टेम्परेट’ (समशीतोष्ण) असे प्रकार आहेत. यामधील 'अंटार्क्टिक' आणि 'सब-अंटार्क्टिक' वातावरणातील पेंग्विन हे नावाप्रमाणेच बर्फाळ प्रदेशात अधिवास करतात. तर 'टेम्परेट' वातावरणातील पेंग्विन थंड पाण्यामध्ये राहतात. मुंबईच्या 'वीरमाता जिजाबाई भोसेल प्राणिसंग्रहालया'त (राणीची बाग) असणारे 'हम्बोल्ट' प्रजातीचे पेंग्विन हे थंड पाण्यात अधिवास करणारे पेंग्विन्स आहेत. पेंग्विनच्या बहुतांश प्रजाती या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामधील 'टेम्परेट' वातावरणात आढळून येतात. केवळ काही प्रजाती या उत्तर गोलार्धातील अंटार्क्टिक खंडावर अधिवास करतात. 'गॅलापागोस पेंग्विन' ही प्रजात केवळ विषुववृत्ताच्या क्षेत्रात अधिवास करते. 
 
  
 
 
 
 
 
'आययूसीएन' पेंग्विनच्या सर्वच १८ प्रजातींचा समावेश संकटग्रस्त प्रजातींच्या लाल यादीत केला आहे. यामधील पेंग्विन्सचा दहा प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दहा प्रजातींमध्ये फोर्डलँड पेंग्विन, साऊथर्न रॉकहॉपर पेंग्विन, हम्बोल्ट पेंग्विन, मॅगेलेनिक पेंग्विन, यलो आयईड पेंग्विन, गॅलापागोस पेंग्विन, आफ्रिकन पेंग्विन, मकरोनी पेंग्विन, इरेस्ट-क्रेस्टेड पेंग्विन, इरेस्ट-क्रेस्टेड पेंग्विन, नॉर्दर्न रॉकहॉपर पेंग्विनचा समावेश आहे. हवामान बदलाच्या परिणामामुळे पेेंग्विनचा अधिवास नष्ट होत आहे. अंटार्क्टिकावरील पेंग्विन वसाहतींमधील संख्याही हवामान बदलामुळे कमी झाली आहे. याशिवाय जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांसाठी असलेली स्पर्धा, रोग आणि विस्थापनामुळे पेंग्विनच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाच्या पशुवैद्यक डाॅ. मधुमिता काळे-वझे यांनी सांगितले की, पेंग्विन्सच्या प्रजातींना अतिरिक्त मासेमारी आणि अधिवासामधील मानवी हस्तेक्षपाचाही धोका आहे. पेरू आणि आसपासच्या देशांमध्ये  'हम्बोल्ट पेंग्विन'ची विष्टा ही खत बनवण्यासाठी वापरली जाते. ज्याला 'ग्वानो' असे म्हणतात. ही विष्टा गोळा करण्यासाठी माणसे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे त्यांनी सांगितले.. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@