गंभीरचे पुन्हा माणुसकीचे दर्शन ; घरकाम करणाऱ्या महिलेचे केले अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2020
Total Views |

gautam gambhir_1 &nb
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोणाचा विळखा वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने पुन्हा एकदा देशासमोर माणुसकीचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचे दुर्दैवी निधन झाले. यासंबधी माहिती त्याने ट्विटरवरून दिलीच शिवाय त्याने त्या महिलेचे अंत्यसंस्कारही केले.
 
 
ही दुखद बातमी सांगताना गान्म्भिरणे म्हंटले आहे की, “त्या आमच्या कुटुंबाच्या एक सदस्य होत्या आणि त्यांचे अंत्यसंस्कार करणे ही माझी जबाबदारी होती. जात, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार मी करत नाही. चांगला समाज निर्माण करण्याचा हाच मार्ग आहे. ओम शांती.” असे करून गंभीरने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले. तत्पूर्वी, कोरोनासारख्या शत्रूचा मुकाबला करण्यासाठी गंभीरने नवी दिल्ली सरकारला ५० लाखांची मदत केली. याशिवाय त्याने दोन वर्षांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे. तसेच त्याने काही रुग्णालयामध्ये ५०० पिपिई किट्सचे वाताप्देखील केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@