देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भाजपच्या 'कोविड हेल्पलाईन'ची सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2020
Total Views |
 
Devendra Fadanvis And MP
 
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी भारतीय जनता पक्षाच्या 'कोविड हेल्पलाईन'ची सुरुवात केली. माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवास स्थान सागर बंगलो येथे मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कोरोना संकटाचा सामना करणा-यांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मलबार हिल क्षेत्राशी निगडीत या कोविड हेल्पलाईन प्रमाणेच मुंबईच्या सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजप कोविड हेल्पलाईन सुरू करणार आहे.
 
 
 
फडणवीस यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या ह्या हेल्पलाईनमुळे लोकांना कोरोना संकटाच्या ह्या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये मदत मिळेल. महानगरपालिकेद्वारे अधिकृत केलेले कोविड डॉक्टर, क्वारंटाईन सेंटर्स, कोरोनासाठी आरक्षित रुग्णालये, बिगर कोविड रुग्णालय, बिगर कोविड सामान्य क्लिनिक, पोलिस स्थानक, रेशन दुकान, मंत्रालय नियंत्रण कक्ष, वार्ड कंट्रोल रूम, आरोग्य अधिकारी व रुग्णवाहिकेशी संबंधित मदत, सुविधा व सेवांच्या संदर्भात आवश्यक माहिती ह्या हेल्पलाईनद्वारे घेता येऊ शकते.
मलबार हिलशी संबंधित हेल्पलाईन क्रमांक 7021584358 आणि 8879774368 वर स्थानिक लोक आपल्या भागातील कोरोना संकटाच्या परिस्थितीमध्ये सहाय्य, सुविधा व सेवा प्राप्त करू शकतात. हेल्पलाईन सुरू होण्याच्या प्रसंगी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर व मलबार हिल भाजपाचे अध्यक्ष विनय अंतरकरसुद्धा उपस्थित होते.
 
 
 
विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले की, 'कोरोना संकटाच्या काळात ही अतिशय उपयोगी हेल्पलाईन ठरेल व त्याद्वारे सामान्य व्यक्तींना कोरोना संकटामध्ये आपल्या आवश्यक सुविधा प्राप्त करण्यासाठी सहजपणे संपर्क करता येईल. अशा प्रकारची हेल्पलाईन मुंबईतील प्रत्येक भागासाठी बनवली जावी ज्यामुळे सामान्य जनतेला आपल्या गरजेच्या वेळी संपर्क करताना कोणतीही अडचण येणार नाही.' मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी फडणवीसांच्या विधानाला आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये अशी हेल्पलाईन सुरू केली जाईल, असे सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@