फरार मौलाना सादचा पळपुटेपणा उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2020
Total Views |
Maulana Sad_1  
 
 
 

दिल्ली पोलीसांकडून अलिशान बंगल्यावर छापा




नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात निझामुद्दीन मरकज येथे तबलिघी जमातचा कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण देशाला कोरोनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या मौलाना सादवर तोंड लपवून बसण्याची वेळ आली आहे. क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतरही तो पोलीसांसमोर हजर झालेला नाही.
 
या दरम्यान त्याचा वकील फुजैल अय्यूबी याने प्रसिद्धीमाध्यमांसमोर त्यांची बाजू मांडली. मौलाना सादने क्वारंटाईन पूर्ण केली आहे. दरम्यान, त्याने कोरोना टेस्ट केली असून त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचे सांगितले.अय्यूबीला त्याच्या पोलीसांसमोर उपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सीआरपीसीचा हवाला देत त्याने आरोपीला पोलीसांसमोर हजर राहण्याची गरज नसल्याचे सांगितले.
 
मौलानाची बाजू मांडण्यासाठी मी उपलब्ध असेन असेही तो म्हणाला. सादचा वकील म्हणाला कि, पोलीसांना जी कारवाई करायची ती झाली आहे. पोलीसांनी ज्या दोन नोटीशी पाठवलेल्या होत्या त्यांची उत्तरेही त्यांना मिळाली आहेत. पोलीसांना सहकार्य करण्यास साद अजूनही तयार का होत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
तसेच ते डॉक्टर कोण आहेत कि, ज्यांनी मौलाना सादची कोरोना चाचणी केली आहे. निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी साद स्वतःहून पुढे का येत नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वीही वकीलांनी साद सर्वांना सहकार्य करेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याचे पालन आता होताना दिसत नाही. मकरजमध्ये कुठलेही बेकायदेशीर काम झालेले नाही, असेही मौलाना सादचा वकील वारंवार सांगत आहे.
 
 
मौलानाच्या फार्महाऊसवर छापा
 
 
तबलिघींचा प्रमुख मौलाना साद हा दिल्ली पोलीसांच्या रडारवर आहे. पोलीस प्रशासनाने त्याचा तपास वेगाने सुरू केला आहे. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात स्थित मौलाना सादच्या फार्म हाऊसवर दिल्ली पोलीसांनी छापा मारला. तसेच सक्तवसुली संचलनालयानेही तबलिघी जमातच्या संदर्भातील संबंधित अन्य काही जणांवरही खटला दाखल केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@