दिलासादायक : पुण्यात ९२ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2020
Total Views |
corona_1  H x W


३ वर्षाच्या नातीसह आजीचे संपूर्ण कुटुंब झाले कोरोनामुक्त


पुणे : देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात पुण्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये ९२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या महिलेची कोरोनावार मात यासाठी महत्वाची आहे कारण तिला सात महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता.


कोरोनामुक्त झालेल्या महिलेसह तिच्या कुटुंबातील चार सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन यांनी सांगितले की, '९२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेसह तिच्या कुटुंबातील ४ जणांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात ३ त्यांच्या वर्षीय नातीचा देखील समावेश आहे. या महिलेने कोरोनावर मात केल्यामुळे समाजामध्ये एक चांगला संदेश जाऊ शकतो की ८२ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली तर ६० वर्षांचा रुग्ण देखील बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नका.'


कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या ५५ वर्षीय मुलाने सांगितले की, आईसह कुटुंबातील ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यावर आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला. मात्र योग्य उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त होता आले.’ तसेच, त्यांनी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@