मोठी बातमी ! डॉक्टरांवर हल्ला पडेल महागात ; केंद्राचा मोठा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |

prakash javadekar_1 
 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली महत्त्वाची घोषणा

 
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सध्या मोठी जबाबदारी आहे. परंतु, काही ठिकणी डॉक्टरांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता केंद्र सरकारने यावर तोडगा काढत स्वतःचे प्राण पणाला लावून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करणायत येणार आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
 
 
“डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये केलेल्या तरतुदीनुसार हल्लेखोरांवर दोन लाखांपर्यंतचा दंडही आकारण्यात येणार आहे. तसेच या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे,” अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
 
 
संबधित बातमीसाठी हे वाचा :
 
 
 
“सध्या कोरोनाच्या लढाईमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. यापुढे हे मुळीच सहन केले जाणार नाही. याचसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. महामारी रोग अधिनियम, १८९७ मध्ये (Epidemic Diseases Act, 1897) सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते २ लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येणार आहे,” असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@