जगभरात कोरोनाविरोधी लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs 
नवी दिल्ली : कोरोनाविरोधात जगभरात चालत असलेल्या लढाईत भारताने जी भूमिका घेतली आहे, त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोविड-१९ ला नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न केलं आहेत, त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात बड्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या डाटा रिसर्चर मॉर्निंग कन्सल्टने अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांवर रिसर्च केला. त्यासोबतच त्यांनी कुठल्या देशातील अध्यक्ष कोरोनावर मात करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, यावरही रिसर्च केला. या रिसर्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना १० देशांच्या नेत्यांशी करण्यात आली.
 
 
 
या दहा देशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव या लिस्टमध्ये प्रथम स्थानावर आहे. मॉर्निंग कन्सल्टने १ जानेवारी २०२० पासून ते १४ एप्रिल २०२० दरम्यान अमेरिका आणि अमेरिकेच्या बाहेरील सर्व माहिती गोळा केली. याच माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाची लढाई लढणाऱ्या १० बड्या नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आठव्या स्थानावर आहेत. तर चीनचे राष्ट्रपती शिन्जो आबे हे दहाव्या स्थानावर आहेत. तर राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं नाव या यादीत नाही.
@@AUTHORINFO_V1@@