जितेंद्र आव्हाड ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |

jitendra awad_1 &nbs



ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड रुग्णालयात


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आव्हाडांनी गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन करुन घेतले होते. मात्र त्यांना काल रात्री ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आल्याने खबरदारी म्हणून तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर आव्हाडांनी आपला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोशल मिडियावर पोस्ट या खोट्या बातम्यांना पूर्णविराम दिला होता.


राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तसेच त्यांनी स्वत:ला काही दिवसांपासून क्वारंटाईन देखील केले होते. मात्र त्यांना काल रात्री पुन्हा एकदा जवळील रुग्णालयात दाखल केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.


काल त्यांनी लिहलेल्या फेसबूक पोस्टमध्येही एनसीपी अध्यक्ष शरद पवारांसोबत बातचीत झाली असून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. आता घरीच राहून पुढील काही दिवस काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याची भावूक पोस्ट देखील जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@