'लाॅकडाऊन'मध्ये काझिरंग्यात गेंड्यांच्या शिकारीला ऊत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |
rhino _1  H x W
 

वन विभागाने आठवड्याभरात सहा प्रयत्न उधळले

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लाॅकडाऊनच्या निमित्ताने आसामच्या 'काझिरंगा राष्ट्रीय उद्याना'त गेंड्यांच्या शिकारीच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आठवड्याभरात सहा शिकारींचा कटाचा प्रयत्न उधळून लावला आहे. गेंड्यांच्या शिंगांना आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करीच्या बाजारात मोठी मागणी आहे.
 
 
 
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅगडाऊन लागू आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. याचाच फायदा शिकारी घेत असल्याचे पुन्हा एकदा निर्दशनास आले आहे. 'काझिरंगा राष्ट्रीय उद्यान' हे एकशिंगी गेंड्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी ११ एप्रिल रोजी, गेंड्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दलातील सदस्यावर विश्वनाथ वनक्षेत्रात गोळीबार झाला. शिकारीसाठी आलेल्या शिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. यामध्ये तो सदस्य जखमी झाला. या घटनेच्या दोन दिवसांनी पोलिसांनी शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या ६ शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. १३ एप्रिल रोजी पोलिसांनी सोनितपूर जिल्ह्यातील नामेरी राष्ट्रीय उद्यानात शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना अटक केली.
 
 
 
 
याविषयी एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाॅकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने शिकारी पुन्हा एकदा गटबद्ध होऊन काझिरंगामध्ये शिकारीचा प्रयत्न करत आहेत. कारण, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीनसह इतर आशिया देशांमध्ये गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध मागणीत वाढ होणार आहे. 'कॉर्बेट फाउंडेशन'चे काझिरंगामधील पशुवैद्यक डॉ. नवीन पांडे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना सांगितले की, गेंड्यांच्या शिकारीचा प्रयत्न ज्या विश्वनाथ वनक्षेत्रात होत आहे, तो भाग वर्षभरापूर्वीच राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट करण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत काझिरंगा प्रशासनातील अधिकारी शिकार मोहिमेचे नियोजन प्राथमिक स्तरावरच असताना तो कट उधळून लावत आहेत. लाॅकडाऊनच्या काळात एकाही गेंड्याची शिकार झालेली नसून वनाधिकारी शिकारीच प्रयत्न वेळीच रोखत आहेत. गेंड्याच्या शिंगामध्ये कामोत्तेजक वाढण्याची शक्ती असल्याचा गैरसमजूतीने त्याची तस्करी केली जाते. परंतु, मानवी नख आणि केस ज्या केराटिनपासून पेशींपासून तयार झालेले आहे, त्याच पेशीपासून हे शिंग तयार होते.
@@AUTHORINFO_V1@@