साधूंच्या हत्या : पत्रकार गप्प ! थेट प्रक्षेपणात अर्णब गोस्वामींचा पत्रकार संघटनेचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |
Arnab and Shekhr Gupta_1&
 

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांनी थेट प्रक्षेपणादरम्यान 'गिल्ड ऑफ एडिटर्स इंडिया'चा राजीनामा जाहीर दिला. या थेट प्रक्षेपणाची व्हिडिओ क्लिप ट्विटरवर व्हायरल झाली आहे. हा राजीनामा देत असताना अर्णब गोस्वामी यांनी 'गिल्ड ऑफ एडिटर्स इंडिया'ला दोष दिला. अध्यक्ष शेखर गुप्ता हे संस्थेची संपादकीय विश्वासाहर्ता नष्ट करत असल्याचा आरोप करत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 
 
 
एडिटर गिल्डच्या सदस्यपदाचा राजीनामा देताना गोस्वामी यांनी टीका केली की, “मी बर्‍याच काळापासून संपादकांच्या गिल्ड ऑफ इंडियाचा सदस्य होतो. ‘गिल्ड ऑफ इंडिया’ संपादकीय नीतिमत्तेशी तडजोड करत असल्यामुळे मी थेट प्रक्षेपणादरम्यान राजीनामा देत आहे.” थेट प्रक्षेपण होत असणाऱ्या कार्यक्रमात जेव्हा अर्णब गोस्वामी यांनी राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्रातील पालघरमध्ये १६एप्रिल रोजी झालेल्या साधूंच्या हत्याकांडावर चर्चा चर्चा सुरू होती. यादरम्यान गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शेखर गुप्ता हे संस्थेची विश्वासाहर्ता नष्ट करत असल्याचा आरोप करत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 
 
 
तसेच कोरोना साथीच्या फैलावासोबत फिरत असणाऱ्या फेक न्यूजवरदेखील शेखर गुप्ता यांनी मौन बाळगले यावरून देखील गोस्वामी यांनी त्यांना लक्ष्य केले. अर्णब गोस्वामी या चर्चेदरम्यान असे म्हणताना दिसतात, "शेखर गुप्ता, तुम्ही माझ्याकडून पहिल्यांदा ऐका... एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची जी विश्वासार्हता शिल्लक राहिली होती ती फेक न्यूजवरील तुमच्या अपमानास्पद मौनामुळे संपुष्टात आली आहे. आता केवळ ही एक स्वयंसेवी संस्था राहिली आहे."
 
 
दरम्यान १६ एप्रिल रोजी पालघरपासून १०० किमी अंतरावर असणाऱ्या गडचिंचले याभागात २ हिंदू साधूंसह एका ड्रॉयव्हरची जमावाने हत्या केली होती. यासंदर्भात थेट प्रक्षेपित होत असलेल्या चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामीनें त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे या घटनेविरूद्ध बोलू न शकल्याबद्दल आणि संघटनेची उर्वरित विश्वासार्हता नष्ट केल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष शेखर गुप्ता यांना अर्णब गोस्वामीने फटकारले व एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या प्रक्षेपणाचा व्हिडिओ सध्या ट्विटवर व्हायरल झालेला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@