पश्चिम महाराष्ट्रातील ६७ हजार कुटूंबांना रा.स्व.संघाचा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |
RSS_1  H x W: 0
 
 
 
 

एक हजार ठिकाणी सेवा कार्यातून सावरले हजारोंचे संसार, स्थलांतरितांना शिधा वाटप

 
पुणे : सध्या जगभर कोरोनाने (कोविड-१९) थैमान घातले आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात मदतीसाठी अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयंशिस्तीने पुढाकार घेऊन सेवाकार्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे १ हजार १७ ठिकाणी विविध सेवाकार्यासह ६७ हजार, ७९३ कुटुंबीयांना शिधा पुरविल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख अनिल व्यास यांनी दिली.
 
 
‘लॉकडाऊन सुरु झाल्यापासून २० एप्रिलपर्यंतची पश्चिम महाराष्ट्रातील मदतकार्यविषयक आकडेवारीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “१,०१७ ठिकाणी ३,२१० स्वयंसेवकांच्या माध्यमातून ६७,७९३ कुटुंबांना धान्य वितरण, ४,४८,०२१ नागरिकांना भोजन, ७८,३२५ मास्क वितरण, ४०० स्थानी स्टे होमसाठी प्रयत्न केले आहेत. याचबरोबर ४,१७८ बाटल्या रक्तसंकलन केले आहे. या सेवेचा लाभ ५ लाख, १७९ व्यक्तींना मिळाला आहे. आपदा केंद्रांच्या माध्यमातून हे मदतकार्य सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुरू आहे.
 
 
या मदतकार्यापलीकडे जे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. खरंतर अन्य आपत्तींच्या काळात काम करणे व सध्याच्या संसर्गजन्य जगव्यापी आजारात काम करण्यात जमिनास्मानाचा फरक आहे. संघ स्वयंसेवक या सर्व मर्यादा लक्षात घेऊन फार मोठ्या संख्येने काम करत आहेत.
 
 
स्वयंसेवकांना प्रशिक्षण
 
 
वेगवेगळ्या जिल्ह्यात कसे प्रयत्न सुरू आहेत याबाबत व्यास यांनी सांगितले की, पुणे महानगर संघरचनेनुसार पूर्ण महानगरात असलेल्या ३९२ वस्त्यांमध्ये सेवा केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्येक वस्तीत तीन-चार पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा गट करणे, या सर्व स्वयंसेवकांचे आधुनिक माध्यमांचा उपयोग करून प्रशिक्षित करणे, त्यांना वाहतुकीसाठा आवश्यक ते परिचय पत्रे शासकीय व पोलीस यंत्रणेकडून मिळवून देणे अशा शिस्तबद्ध पद्धतीने हे काम केले जात आहे. यात वैद्यकीय सुरक्षा साहित्य वाटप, रोज आवश्यक त्या नागरिकांना भोजन देणे, आठवड्याचे/दहा दिवसांचे धान्य वितरीत करणे, रक्तदान करणे, अशी कामे आहेतच. मात्र, त्याचबरोबर सामाजिक विलगीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे, सोसायट्यांतून व विविध ठिकाणी भाज्या विक्री करणे आदी विषय हाताळले जात आहेत. कमी-अधिक प्रमाणात सर्व प्रांतांत याच पद्धतीने सेवा दिली जात आहे.
 
 
लालबत्ती विभागात मदत
 
 
पुणे आणि नाशिकमध्ये लालबत्ती विभागातील महिलांसाठी (देवदासींसाठी) भोजन/धान्य वितरण होत आहे. नाशिकमध्ये २२ मार्चनंतर सर्व व्यवहार बंद झाल्यावर अडकून पडलेल्या सर्व ट्रकचालकांना मोठ्या प्रमाणावर भोजन वितरणाचे काम केले आहे. प्रमुख शहरातून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेल्या युवकांची फार मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना रोजगार नाही व घरात अन्न शिजविण्याची सोय नाही, अशांसाठी मोठ्या प्रमाणावर भोजन वितरण केले जात आहे. प्रामुख्याने पुणे महानगर, पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड, सांगली, नाशिक व शिर्डी या ठिकाणी हे काम केले जात आहे.
 
 
स्थलांतरित कुटुंबाना आधार
 
स्थलांतरित असलेल्या कुटुंबासाठी (विशेषतः ऊसतोड कामगार, दीर्घ काळ नोकरीनिमित्त आलेली मंडळी) अशांसाठी शिधावाटप योजना राबविली गली.पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात गरजूंना एकावेळी आठ ते दहा दिवसांचे शिधावाटप केले जात आहे. याद्वारे सुमारे ६७ हजार, ७९३ कुटुंबांना ही मदत करण्यात आली,” असे व्यास यांनी सांगितले.
 
 
साहित्य, औषधाचे वितरण
 
 
साहित्य वितरणाबाबत व्यास यांनी सांगितले, मास्क तयार करून घेणे व त्याचे वितरण करणे, सॅनिटायझर, हातमोजे वितरण असेही अनेक विषय राबविले जात आहेत. त्याचबरोबर औषध वितरणाचे काम प्रामुख्याने पूर्ण शहरात केले जात आहे. गेल्या महिनाभरात पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, सातारा, कराड अशा शहरांतून सुमारे चार हजारहून अधिक नागरिकांनी योग्य ते नियम पाळून रक्तदान केले.
 
 
सेवा यंत्रणेला मदत
 
 
सद्यस्थितीत पोलीस यंत्रणा, प्रशासन व वैद्यकीय सेवेतील मंडळींना ताण सहन करावा लागतो, असे नमूद करत व्यास यांनी सांगितले की, सेवा देणार्‍या यंत्रणेला स्थानिक स्वयंसेवक आवश्यक ती सेवा देत आहेत. श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, पुण्यातील सिंहगड भागात पोलिसांना राहुट्या उभारून दिल्या आहेत. बिबवेवाडी (पुणे), लोणी-काळभोर येथे सॅनिटायझर टनेल तयार करून दिले आहेत. यासह विविध सेवा कार्य अविरतपणे सुरू आहेत.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -
 
केंद्रीय (राष्ट्रीय) सेवावृत्त माहिती
१. सेवा स्थान ४५,१३१
२. सेवारत कार्यकता २,५२,१०१
३. सेवित परिवार राशन किट २८,८९,६९९
४. तयार भोजन पॅकेट १,८६,५०,०१४
५. मास्क २४,९७,६२६
६. स्टे होम १०,५७७
७. पर प्रांतीय मदत ३,४२,४३५
८. रक्तदान १०,५७८
९. आयुर्वेदिक काढा १३,८७,२६५
 
@@AUTHORINFO_V1@@