मीरा रोडमधील कोरोना संशयितांच्या घरांमधून प्राण्यांची सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |

 animal _1  H x

 

'पाॅस'च्या कार्यकर्त्यांकडून ससे, कासव आणि मांजरीचा बचाव

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - मीरा रोडमधील कोरोना संशयितांच्या घरातून प्राणिप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ससे, कासव आणि मांजराची सुटका केली आहे. प्रशासनाने या संशयितांचे घर सीलबंद केल्याने हे प्राणी घरामध्ये उपाशीपोटी अडकून पडले होते. कार्यकर्त्यांनी सर्तकता बाळगून या प्राण्यांचा बचाव केला असून सध्या ते देखरेखीखाली आहेत.
 
 
 
 
 
प्रशासनाने कोरोना संशयित किंवा बाधितांचे विलगिकरण केल्यानंतर त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांचे हाल होत आहेत. अशा प्राण्यांना वाचविण्याचे काम शहरातील काही प्राणिप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते करत आहेत. प्रसंगी स्वत:ला कोरोनाची लागण होण्याची भिती असताना देखील सर्तकता बाळगून हे कार्यकर्ते प्राण्यांचे बचाव कार्य पार पाडत आहेत. 'प्लांट अॅण्ड अॅनिमल्स वेलफेअर सोसायटी'च्या (पाॅस) कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाडुंपमधून कोरोना मृताच्या घरातून पोपटाचा बचाव केला होता. आता या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोडमधील कोरोना संशयितांच्या घरांमधून दोन ससे, कासव आणि मांजराची सुटका केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संशियातांचे विलगिकरण केल्यानंतर हे प्राणी उपाशीपोटी घरात अडकून पडले होते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी 'पाॅस'च्या कार्यकर्त्यांना बोलावून या प्राण्यांची सुटका केली.
 
 

animal _1  H x  
 
 
 
 
मीरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या बोलावण्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संशियातांच्या घरांमधून मांजर, दोन ससे आणि कासवाचा बचाव केल्याची माहिती 'पाॅस'चे प्रमुख आणि मुंबई शहराचे मानद वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी दिली. पशुवैद्यक डाॅ. मनीष पिंगळे यांनी या प्राण्यांची आरोग्य तपासणी केली असून काही दिवस त्यांची देखरेख करण्यात येणार आहे. त्यामधील कासव हे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेले साॅफ्टशेल प्रजातीचे कासव आहे. त्यामुळे मालकाला ते पुन्हा देण्यात येणार नसल्याचे कुंजू यांनी सांगितले. यावेळी बचावासाठी गेलेले कार्यकर्ते आणि पशुवैद्यकांनी सर्तकता म्हणून पीईपी सूट परिधान केल्याचे कुंजू यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@