योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट कालवश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |

UP CM's Father Andnad Sin




नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे सोमवारी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यात त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्या तआले होते. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या निधन वृत्ताला दुजोरा दिला आहे.


उत्तर प्रदेशचे अतिरिक्त गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे सकाळई १० वाजून ४४ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.' उत्तराखंड येथील पौडी जिल्हात यमकेश्वर गावातील पंचूर येथील निवासी आनंद सिंह बिष्ट हे ८९ वर्षांचे होते.


गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. एम्स रुग्णालयात त्यांना एबी वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. गैस्ट्रो विभागाचे डॉक्टर विनीत आहूजा यांचे पथक त्यांच्यावर इलाज करत होते. रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. आनंद सिंह बिष्ट यांना यकृत आणि मुत्रपिंडाचा त्रास होता. त्यांचे डायलिसिसही करण्यात आले होते.


पौडी या त्यांच्या गावी त्यांना जॉलीग्रांटच्या हिमालयन हॉस्पिटल ठेवण्यात आले होते. प्रकृती काहीशी सुधारल्यावर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात ठेवण्यात आले. आनंद सिंह बिष्ट उत्तराखंडमध्ये फॉरेस्ट रेंजर होते. १९९१ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर आपल्या मूळ गावी येऊन ते राहिले होते.
@@AUTHORINFO_V1@@