लॉकडाऊनमध्ये मुंबईहून कंटेनरने प्रवास करणे पडले महाग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |
kolhapur_1  H x

कोल्हापुरात तरुणापाठोपाठ महिलेलाही 'कोरोना'


कोल्हापूर : लॉकडाऊन असताना मुंबईहून कोल्हापूरला कंटेनरने लपतछपत प्रवास करणे दोघांना महागात पडले आहे. तरुणानंतर आता कोल्हापूरला आलेल्या महिलेचे ‘कोरोना’ रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहावर गेली आहे.


लॉकडाऊनच्या काळात कंटेनरमध्ये लपून मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या एका कामगाराला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे कालच समोर आले होते. आता, याच कंटेनरमधून प्रवास केलेल्या ४२ वर्षीय महिलेचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.


कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. दरम्यान, हातकणंगले तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोले मळा परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने इचलकरंजी शहरामध्ये ‘कोरोना’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोले मळा परिसर पालिका प्रशासनाने सील केला असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस, पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
@@AUTHORINFO_V1@@