साधूंची हत्या : बाळासाहेब तुम्ही पाहत आहात ना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |
CM UT and Ladakh MP namgy
 
 
 

लडाखचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांचे मराठीत ट्विट

 
 
 
लडाख : पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणी लडाखचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनीही आता प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत तुम्ही हे सर्व पाहात आहात ना, अशी भावूक प्रतिक्रीया साधूंच्या मृत्यूनंतर दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मराठीत ट्विट करत या प्रकरणाचा जाब विचारला आहे.
 
 
 
 
 
'पालघरची घटना धक्कादायक, अमानुष आणि लज्जास्पद आहे! सर्वात आदरणीय बाळासाहेब ठाकरे, तुम्ही कुठून तरी पहात आहात?', अशा शब्दांत खासदार नामग्याल यांनी राज्य सरकारला सवाल विचारला आहे. त्यांचा हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट असल्याचे दिसते. एकूणच देशपातळीवर राज्यातील या प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी ट्विट करत या मॉब लिंचिंगबद्दल बोलणारे आवाज का काढत नाहीत, असा प्रश्न विचारत आहेत. तसेच पुरस्कार वापसी गँगवाले कुठे आहेत, काहीतरी बोला, असा सवाल आता नेटीझन्सनी या माधम्यातून विचारला आहे.



 














 





 
 
@@AUTHORINFO_V1@@