मुंबई, कोलकाता, जयपूर आणि इंदूरसह ११ शहरांमध्ये संसर्गाची स्थिती गंभीर

    20-Apr-2020
Total Views |

Corona_1  H x W


गृह मंत्रालयाने व्यक्त केली चिंता


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ हजार ४८० वर पोहोचला आहे. सोमवारी गुजरातमध्ये १०८, पश्चिम बंगालमध्ये २९, उत्तरप्रदेश आणि राजस्थानात प्रत्येकी १७ आणि ओडिशामध्ये ७ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान रविवारी २० राज्यांत १५८० संक्रमित वाढले. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढण्यातचा हो सर्वात मोठा आकडा आहे. याआधी शनिवारी १३७१ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रविवारी महाराष्ट्र (५५२), गुजरात (३६७) आणि राजस्थानात (१२७) १०४६ नवीन प्रकरणे समोर आली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या १७ हजार २६५ प्रकरणे समोर आली आहे. यातील १४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २५४६ बरे झालेत तर ५४३ लोकांचा मृत्यू झाला आहे.


गृह मंत्रालयाने काही शहरांमध्ये कोरोना संसर्गाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे, राजस्थानातील जयपूर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, मेदनीपूर पूर्व, उत्तर परगना, दार्जिलिंग, कॅलीम्पोंग आणि जलपाईगुडी येथे स्थिती गंभीर आहे.


गोव्यानंतर मणिपूरही आता कोरोनामुक्त
गोव्यानंतर मणिपुरही कोरोनामुक्त झाले आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी ही माहिती दिली. मणिपुरमध्ये कोरोनाचे २ रुग्ण होते, दोघेही पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच राज्यात संक्रमणाचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही. याआधी रविवारी गोवा कोरोनामुक्त झाले. येथील सर्व ७ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.