साधु हत्या: भाजप सरपंचाला अटक नाहीच : खोट्या ट्विटप्रकरणी वागळे, सूर्यवंशींविरोधात तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |
tweet_1  H x W:



मुंबई : पालघरमध्ये साधूंच्या झालेल्या हत्याकांड प्रकरणात चुकीची माहिती प्रसारीत केल्याप्रकरणी भाजप मुंबईचे सचिव ऍड.विवेकानंद गुप्ता यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत, न्यू इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी आणि निखिल वागळे यांच्याविरोधात सायबर सेलकडे आयटी ऍक्ट व आयपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
 
 
पालघरच्या हद्दीत काल झालेल्या हिंदु साधूंच्या हत्याकांडप्रकरणाची चुकीची माहिती हे तिघे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. या प्रकरणाच्या खोट्या बातम्या छापून आणत आहेत, अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे. अशा माहितीमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो. सचिन सावंत यांनी ट्विट केले की, 'ज्याभागात हे हत्याकांड घडले त्या भागात भाजपचा सरपंच आहे.' तसेच अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
अशाच स्वरूपाचे ट्विट पत्रकार सूर्यवंशी यांनीही केले आहे की, या हत्याकांड प्रकरणात एका भाजप सरपंचाला अटक करण्यात आली आहे. वागळे यांनीही ट्विट केले आहे की, भाजपचा या हत्याकांडामागे हात आहे आणि पोलिसांनी त्यापैकी काही जणांना अटक केली आहे. असे करत त्यांनी अटक केलेल्या व्यक्तींची ओळख जाहीर केली. अटक केलेल्या व्यक्तींच्या ओळखीची ही माहिती खरी असल्यास पोलिस काही निवडक व्यक्तींकडे सत्ताधारी पक्षांच्या राजकीय अजेंड्याच्या संदर्भाने चौकशीची माहिती बाहेर उघड करत आहेत.
 
सर्वोच्च न्यायालय आणि गृह मंत्रालय यांनी खोट्या व चुकीच्या बातम्यांच्या प्रकाशनाविरोधात कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींवर एफआयआर दाखल करावी अशी मागणी ऍड विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे. 'सचिन सावंत, पत्रकार सुधीर सूर्यवंशी व निखिल वागळे यांनी पसरवलेली माहिती आयटी कायदा व भारतीय दंड संहितेच्या अफवा व चुकीची माहिती पसरवण्याच्या विविध कलमांअंतर्गत येतात, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणतात, या हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी त्यांच्या संपर्कातील खासगी व्यक्ती व राजकीय पक्षांना निवडकपणे माहिती पुरवत आहेत की नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे आणि त्याअनुषंगाने या खटल्याची निष्पक्षता आणि योग्य चौकशी करण्यात यावी.अशी मागणी त्यांनी ईमेलद्वारे केलेल्या तक्ररीत केली आहे.
 
 
 
 


 
@@AUTHORINFO_V1@@