कोरोना कहर (भाग-५)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |


corona fake news_1 &



‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सूचनांनुसार कोरोनाचा विषाणू सुरुवातीला काहीही लक्षणे न दाखवणे ते गंभीर न्यूमोनियाची लक्षणे दाखवणे अशा स्वरुपात व्यक्त होऊ शकतो.या आजाराने प्रभावित होऊन लक्षणे दाखविण्याचा कालवधी (Incubation period) हा पाच ते सहा दिवसांचा असतो.‘जागतिक आरोग्य संघटने’च्या माहितीनुसार कोरोनाविषयी काही समज आणि गैरसमज आपण जाणून घेऊया.



१) लसूण किंवा लवंग खाऊन या विषाणूला रोखता येत नाही.
२) सर्वांगावर तिळाचे किंवा ऑलिव्हचे तेल लावून या विषाणूला मारता येत नाही.
३) माऊथवॉशने गुळण्या केल्यावर कोरोना व्हायरस मरतो, हासुद्धा एक गैरसमज आहे, असे अजिबात होत नाही.
४) नाकात सतत सलाईनचे पाणी घातल्यामुळे हा संसर्ग थांबू शकत नाही.
५) शरीरावर ‘क्लोरीन’ किंवा अल्कोहोलचा फवारा मारल्यास हा व्हायरस मरतो, हासुद्धा एक गैरसमजच आहे.
६) अल्ट्राव्हायोलेट दिव्याच्या प्रकाशामुळे हा व्हायरस मरतो, हासुद्धा एक गैरसमजच आहे.
७) फटाक्यांच्या किंवा आगीच्या धुरात कोरोना व्हायरस मरत नाही.
८) मद्यपानामुळे कोरोना विषाणू मरतो, हा एक चुकीचा समज आहे.
९) घरातील पाळीव प्राण्यांमुळे कोरोना व्हायरस पसरल्याची अद्याप कुठेही नोंद नाही.
१०) कुठलेही अ‍ॅण्टिबायोटिक या कोरोना विषाणूवर कार्य करत नाही.
११) या कोरोना विषाणूपासून प्रतिबंध करणारी आत्तापर्यंत कुठलीही लस जगात निघालेली नाही.
१२) चीनवरून आलेले कुठलेही सामान किंवा पार्सल किंवा पत्र हे कोरोना व्हायरस पसरवू शकत नाहीत. कारण, तपासाअंती असं लक्षात आले आहे की, कोरोना व्हायरस वस्तूंवर किंवा पत्रावर फार काळ जीवंत राहू शकत नाही.
 

आपल्या देशाचा विचार केल्यास, भारत हा समशीतोष्ण व काही प्रमाणात उष्ण कटिबंधातील देश आहे. विषुववृत्त हे भारताच्या दक्षिणेकडून जाते, तर कर्कवृत्त हे कोलकात्याच्या जवळून जाते. त्यामुळे आपल्या देशाचे वातावरण हे समशीतोष्ण आहे. अशा प्रकारच्या वातावरणात कोरोना व्हायरस हा तग धरू शकत नाही. त्यामुळे भारतीय लोकांना भयग्रस्त होण्याचे कारण नाही. भारतामध्ये प्रामुख्याने जे रूग्ण आढळले आहेत व ज्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे, ते लोक मुख्यत्वे बाहेरून आलेले आहेत. देशात लागण झालेल्या लोकांची संख्या ही अत्यंत क्षुल्लक अशी आहे. हे बाधा झालेले बहुतांश रूग्ण आता धोक्याच्या बाहेर आहेत. भारत सरकारने आयुष मंत्रालयामार्फत होमियोपॅथीचे उपचार हे कोरोना व्हायरससाठी अत्यंत उपयुक्त उपचार असल्याचेही पत्रक जारी केले आहे. तेव्हा पुढील भागात आपण होमियोपॅथी आणि कोरोनावरील उपचार या संदर्भात माहिती घेऊया. (क्रमशः)
 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@