'तब्लीग-ए-जमात'मधील एक जण रत्नागिरीत रुग्णालयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
ratnagiri_1  H

जिल्ह्यातील एकूण तीन व्यक्तींची मेळाव्याला हजेरी


मुंबई (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातून दिल्लीतील तब्लीग-ए-जमात या कार्यक्रमासाठी तीन जण गेल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात परतलेल्या या तिघांची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतली असून त्यामधील एकाला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या कोरोना चाचणी अहवालाची जिल्हा प्रशासन वाट पाहत आहे.
 
 
 
 
दिल्लीत पार पडलेला तब्लीग-ए-जमात हा मुस्लीम धार्मिक मेळावा देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जवळपास एक हजार मुस्लीम नागरिक गेले होते. आता राज्यात परतलेल्या या व्यक्तींचा शोध आरोग्य प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील तीन व्यक्ती या मेळाव्याला उपस्थित होत्या. काही दिवसांपू्र्वी रत्नागिरी जिह्यातील एकमेव कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतला होता. आता तब्लीग-ए-जमातमध्ये उपस्थित असलेल्या तीन व्यक्तींचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला आहे.
 
 
 
 
निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती जिल्ह्यात परतल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली असून तिच्या प्रतीक्षेत आम्ही असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. तर उर्वरित दोन व्यक्ती मुंबई आणि आग्रामध्येच असल्याचे ते म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@