गोव्यातील २३ मुस्लिम धर्मिय तब्लिगीच्या कार्यक्रमात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |


goa_1  H x W: 0



पणजी : दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज भवनमध्ये झालेल्या तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात गोव्यातील २३ जण जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण गोव्यात सध्या ४६ जण कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांपैकी २३ जण तब्लिगीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती आहे.



जगातील
१५० पेक्षा अधिक देशांत इस्लामच्या प्रसार-प्रचारार्थ सक्रिय असलेल्या तब्लिगी जमात या संघटनेने दि. मार्च ते १५ मार्च या कालावधीत दिल्लीतील मरकज भवनमध्ये धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते आणि नंतर देशात लॉकडाऊनचा निर्णय झाला.



सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. असे असूनही मरकज भवनमध्ये या आदेशाला हरताळ फासला गेल्याचे
३१ मार्च रोजी उघड झाले. इथे तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात विदेशातील मुल्ला-मौलवींनी सहभाग घेतल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजले. तसेच याच कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील मुस्लिम धर्मियांनीही उपस्थिती लावली होती. त्यातच गोव्याच्या २३ लोकांनी उपस्थिती लावल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, यांपैकी गोव्यात क्वारंटाईन केलेल्या ४६ जणांपैकी ३८ लोक दक्षिण गोव्यातले असून लोक उत्तर गोव्यातील आहेत.

@@AUTHORINFO_V1@@