दिल्लीच्या ‘त्या’ कार्यक्रमातून परतलेल्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
 
solapur 2_1  H
 
 
 
सोलापूर : कोरोना विरुद्ध देशाचा लढा सुरु असतानाच दिल्लीमध्ये झालेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाने सर्वंची झोप उडवली आहे. यामध्ये ९ हजाराहून अधिक जणांचा समावेश होता. तर या कार्यक्रमासाठी सोलापुरातून १७ जण गेले होते. सर्वत्र हा मुद्दा चर्चेत असताना सोलापुरामध्ये या कार्यक्रमावरून परतलेल्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली गुरुवारी घडली आहे.
 
दिल्लीच्या निझामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जाऊन आलेले परत आपल्या गावात आलेल्यांची माहिती या व्यक्तीने आपल्या ग्रामसेवकाला दिली होती. त्यावरून संतापलेल्या काही लोकांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. तबलीगी समजामध्ये उपस्थिती लावून शेकडोंच्या संख्येने लोक महाराष्ट्रात परतले आहेत. विविध शहरात असलेल्या या लोकांची माहिती गोळा करून स्थानिक प्रशासन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सोबतच, त्यांच्या चाचणीची देखील व्यवस्था केली जात आहे.
 
अशावेळी सोलापूरच्या पिंपरी गावात काही लोक याच जमातवरून परतल्याची माहिती समोर आली. पिंपरीतील एका ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या भागात दिल्लीच्या जमातवरून परतलेल्यांची माहिती ग्रामसेवकाला दिली होती. त्यावरून ग्रामसेवकांनी आवश्यक ती कारवाई केली. परंतु, ज्या व्यक्तीने ही माहिती ग्रामसेवकाला दिली त्यावर काही लोक भडकले आणि त्यांनी या व्यक्तीला बेदम मारहाण केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@