निझामुद्दीनमधील तब्लिगींचा माजुरडेपणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

tabligi_1  H x


डॉक्टरांवर थुंकून केली शिवीगाळ

नवी दिल्ली : निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढले जात असताना तब्लिगींचा मस्तवालपणा पाहायला मिळाला. दिल्लीत ‘कोरोना’ चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांवरच काही तब्लिगी थुंकल्याचे समोर आले आहे. काही जणांनी तर डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.


निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या काही तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. काही जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. क्वारंटाइन केलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत थुंकण्याचा किळसवाणा प्रकार केला.


निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या १६७ जणांना तुघलकाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले आहे. तर ९७ जणांना रेल्वेच्या डिझेल शेड ट्रेनिंग स्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. ७० जणांना आरपीएफच्या बॅरेकमध्ये क्वारंटाईन केल्याची माहिती उत्तर रेल्वे विभागीय मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.


क्वारंटाईन केलेल्या तब्लिगींपैकी काही जण सकाळपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत आहेत. कर्मचाऱ्यांकडे ते अवाजवी खाद्यपदार्थांची मागणी करत आहेत. कर्मचारी-डॉक्टरांच्या अंगावरही थुंकत शिवीगाळ करत आहेत. एका जागी न थांबता होस्टेलमध्ये फिरत आहेत, असेही दीपक कुमार यांनी सांगितले.


‘तब्लिग जमात’मधल्या १९ तब्लिगींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३८९ जणांचे ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. ८७०० तब्लिगी निझामुद्दीनमधील मरकजला गेल्याचे समोर आले आहे. या सर्वांना लगेच ताब्यात घ्या आणि तब्लिगींच्या सहप्रवाशांनाही शोधा, असे केंद्राचे आदेश आहेत. या मोहिमेत गुप्तचर आणि दहशतवादविरोधी पथकही सहभागी झाले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गुप्तचर विभागाद्वारे माहिती काढून तब्लिगींची धरपकड केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@